✍️ मुनिश्वर बोरकर
संपादक
गडचिरोली:-पोर्ला वडधा नवरगांव असा प्रवास करीत हत्तीचा कळप दिभणाच्या जंगलात गेल्या चार – पाच दिवश मुक्काम होता परंतु आज सोमवार दिनांक 3 मार्च २०२५ ला पहाटेच्या सुमारास हत्तीचा कळप चक्क गडचिरोली शहराच्या अवध्या दिड किलोमीटर अंतरावर पोटेगांव रोड जंगल ते सेमानादेव जंगलात येऊन थबकले आहेत. दि. 3 च्या पहाटेला ४ वाजता लांजेडा ते चांदाळा जंगल दरम्यान होते ते पुढे पोटेगांव रोड जंगलात सेमानादेव मार्ग जात असतांना प्रत्यक्षदर्शी वनविभागाच्या गस्त घालत असलेल्या कर्मचाऱ्यांना दिसले. पहाटेला ५ वाजता पोटेंगांव रोडकडे मार्निग वॉकसाठी जाणाऱ्या नागरिकांना वनविभागाच्या गस्त घालणाऱ्या गाडीने हाकलले हत्तीच्या आगमनाने सकाळी फिरणाऱ्यांना भितीचे वातावरण पसरले. गुरवळा रोडवर व चांदाळा रोडवर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी ड्रोन कॅमेरा लावून हत्तीचा कळपाचा शोध घेत होते. वनविभागाचे कर्मचारी पोर्ला वनविभाग ते गडचिरोली वनविभाग चे कर्मचारी रात्रणदिवश हत्तीच्या कळपावर नजर ठेवून आहेत . दिभणा येथील शेतकऱ्यांच्या मका पिकाचे नुकसान करून आज दि 3 च्या पहाटेला हत्तीचा कळप पोटेगांव – सेमाना जंगल परिसरात किती दिवश वास्तव करणार कि परत दिभना मार्ग जाणार यावर गडचिरोली वन विभागाचे कर्मचारी नजर ठेवून आहेत . मागील सहा महिन्यांपूर्वी हत्तीचा कळप दिभना मार्ग वाकडी रोडवर आलेला होता तो वैनगंगा नदिकिणाऱ्या वरून पुन्हा आलेल्याच मार्गाने परतला होता हे विशेष
