विभाग जाहीर आवाहन
✍️दिनेश झाडे
मुख्य संपादक
कोरपना:- कोरपना तालुक्यातील अधिनिस्त संजय गांधी योजना / श्रावणबाळ योजना विभागांअतर्गत सर्व संबंधित लाभार्थ्यांना कळविण्यात येते की, सदरील योजनेअंतर्गत चे अनुदान माहे डिसेंबर २०२४ व जानेवारी २०२५ पासुन DBT ( direct Benefit Transfer) portal मार्फत थेट लाभार्थ्यांच्या खात्यावर अनुदानाची रक्कम जमा करण्यात येणार आहे. तथापि ज्या लाभार्थ्यांनी अद्याप पावतो आपले आधार कार्ड , मोबाईल क्रमांक , बँक खाते, पासबुक , हयात प्रमाणपत्र तसेच लाभार्थी विधवा किंवा दिव्यांग असेल तर पतीचे मृत्यू प्रमाणपत्र किंवा दिव्यांगाचे प्रमाणपत्रासह संबंधित ग्राम महसूल अधिकारी यांच्याकडे किंवा संबंधित तहसील कार्यालयात सादर केलेले नाही अशा लाभार्थ्यांचे अनुदान वरील कागदपत्राअभावी मुदतीत सादर न केल्यास त्यांच्या लाभ बंद होणार आहे. तरी सर्व संबंधित लाभार्थी यांनी उपरोक्त कागदपत्रे पुढील सात दिवसाचे आत (दि. ०९/०३/२०२५ पर्यंत ) संबंधित विभागाकडे सादर करावेत. तसेच ज्या लाभार्थ्यांचे आधार कार्ड अद्यावत नसेल त्यांनी आपले आधार कार्ड अपडेशन करून व संबंधित बँकेतून केवायसी पूर्ण करणे बंधनकारक आहे. लाभार्थींना अडचण आल्यास आपले संबंधित कोतवाल व ग्राम महसूल अधिकारी यांची मदत घ्यावी.
तहसीलदार कोरपना
