राजेश येसेकर : तालुका प्रतिनिधी भद्रावती
भद्रावती : शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्ष प्रमुख आदरणीय उध्दवजी ठाकरे यांच्या कार्यास प्रेरीत होवून, पूर्व विदर्भ संपर्क प्रमुख तथा विरोधीपक्ष नेते भास्कर जाधव साहेब, चंद्रपूर-आर्णी लोकसभा संपर्कप्रमुख आमदार संजय देरकर साहेब, चंद्रपूर जिल्हा संपर्कप्रमुख प्रशांत दादा कदम, चंद्रपूर जिल्हा महिला सर्पक प्रमुख सुषमाताई साबळे यांचे मार्गदर्शनात तसेच तालुकाप्रमुख आशाताई ताजने यांचे नेतृत्वात चंद्रपूर जिल्हा प्रमुख रवींद्र शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत 75-वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्रातील महिलानी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत सौ. रंजना नारायण खोंड, सौ. सविता नामदेव खाडे, सौ. ज्योती विष्णु सरोदे, सौ. ममता पवन भांबेवार, सौ. वर्षाताई साबळे, प्राध्यापिका उज्वलाताई जयंत वानखेडे, उषाताई आमटे, योगीताताई गोहाणे, विद्याताई मोघे, संगीताताई गोविंदा काळे तसेच सौ. नीताताई विनोद भेंडे आदीनी पक्षात प्रवेश घेतला.
याप्रसंगी चंद्रपूर जिल्हा प्रमुख रवींद्र शिंदे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) परिवारा तर्फे सर्वांचे स्वागत करीत शुभेच्छा दिल्या.

