राजेश येसेकर : तालुका प्रतिनिधी भद्रावती
भद्रावती : स्थानिक श्री. संत नगाजी महाराज मंदिर नगाजी नगर भद्रावती येथे महिला नाभिक समाज, व महिला भिशी ग्रुप तर्फे जागतिक महिला दिना निमित्ताने एक दिवसीय टेलरिंग कापडं, पेपर कटिंग व डिझायनर महिलांना प्रशिक्षण देण्यात आले
या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणुन छाया जमदाडे, प्रमुख पाहुणे नंदिनी लांडगे यांची उपस्थिती होती.
उपस्थितांना मार्गदर्शन करताना भुवनेश्वरी निंबाळकर यांनी हा जागतिक महिला दिन फक्त एक दिवसच तिचा नसतो तर येणारे 365 दिवसही तिचा सन्मान करावा! असेल अनेक उदाहरण देऊन मार्गदर्शन केले. संचालन वर्षा वाटेकर, तर आभार मोनाली जांभुळकर यांनी मानले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रागिणी सूत्रपवार, शोभा लांडगे, माधुरी देवईकर, वैशाली दळवी, मनीषा कडुकरं,शालिनी शेंडे,माया चिंचोलकर, मनीषा दयालपवार, सविता लांडगे अनिता निंबाळकर, सुप्रिया निंबाळकर, प्रगती चौधरी,स्मिता नागपूरकर यांचे सहकार्य लाभले.

