राजेश येसेकर ✍️ तालुका प्रतिनिधी भद्रावती
भद्रावती : तालुक्यात होत असलेल्या अवैध गौण खनिज वाहतुकीला आळा बसावा, या उद्देशाने तहसीलदार राजेश भांडारकर यांनी मोहीम सुरू केली आहे.
त्या अंतर्गत गौण खनिज पथकाद्वारे कारवाईचे सत्र सुरू आहे. यात, शुक्रवार गोपनीय माहितीच्या आधारे मांगली नाल्यावरून अवैद्य रेती भरून येत असलेल्या ट्रॅक्टरचे गोपनीय माहिती भद्रावती शहरात येत असलेल्या दिनांक 4 एप्रिल 2025सकाळी पाच वाजता जामा मजीत जवळ रेती भरून असलेल्या ट्रॅक्टर वर कारवाई करण्यात आली ,एक ब्रास रेती ची कारवाई तहसीलदार राजेश भांडारकर यांच्या नेतृत्वात गौण खनिज पथक मंडळ अधिकारी अनिल दडमल तलाठी खुशाल मस्के, यांनी कारवाई केली ट्रॅक्टर ड्रायव्हर यास अवैद्य रेतीची विचारपूस केली असता, कोणताही परवाना नसल्याबाबत सांगण्यात आले सदर हे वाहन मालक भारत बोडेकर रा. मांगली यांचे असून अवैद्यरित्या वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला ताब्यात घेण्यात आले सदर ट्रॅक्टर तहसील कार्यालयाच्या प्रांगणात लावण्यात आले गौण खनिज पथकाद्वारे एका महिन्यात ट्रॅक्टर व पिकअप व्हॅन,वाहनावर कारवाई करण्यात आलेली आहे,लाखोंचा वर दंड आकारण्यात आलेली आहे,यामुळे अवैद्य रेती तस्कराचे धाबे दणाणले आहे.

