‘जिजाऊ रथयात्रा’ दुभंगलेली मन जोडणारी एक नवसंजीवनी-रामचंद्र सालेकर
✍️राजू गोरे चंद्रपूर प्रतिनिधी
चंद्रपूर:-गेल्या पस्तीस वर्षापासून शिव फुले शाहु आंबेडकर या आपल्या धरोहरांचा वारसा जपत मराठा सेवा संघ ही पुरोगामी चळवळ समता बंधुता व न्यायावर आधारित समाजव्यवस्था आपल्या तेहत्तीस कक्षाच्या माध्यमातून निर्माण करण्याचा प्रयत्न करत आली आहे.
याचाच परिणाम सर्व धर्म समभावाचं प्रतीक असलेल्या मानवतावादाचा संदेश देत महाराष्ट्रभ्रमण करत असलेल्या, जिजाऊ रथयात्रेचे ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत होतं असून,येत्या १० एप्रिल २०२५ ला चंद्रपूर जिल्ह्यात या जिजाऊ रथयात्रेचे आगमन होतं असून चंद्रपूर नगरी स्वागतासाठी सज्ज झाली आहे.
आजच्या धर्मांध जात्यांध अनितीने दूषित राजकीय सामाजिक वातावरणात,समाजाला न्यायाच्या,समतेच्या, बंधुत्वाच्या, एकतेच्या धाग्यात गुफण्याचं कार्य मराठा सेवा संघ पुरस्कृत जिजाऊ रथयात्रा ही दुभंगलेली मन जोडणाऱ्या नवसंजीवनीच काम करत आहे. हल्ली दूषित विषारी अशा सामाजिक राजकीय वातावरणात सामाजिक सौंहार्द बंधुभाव निर्माण करणारा आशेचा किरण जिजाऊ रथयात्रेच्या निमित्ताने अख्खा महाराष्ट्र अनुभवत आहे.
मानव हीच खरी जात व मानवता हाच खरा धर्म हा संदेश देत जिजाऊंच्या रूपाने शिवधर्माची ही ज्योत जिजाऊ रथयात्रेच्या माध्यमातून महाराष्ट्राला प्रकाशमान करून नवी ऊर्जा देण्याचं काम करत आहे.
. खाजगीकरण,भ्रष्टाचार,राजकीय धार्मिक दहशतवाद,वाढत्या महागाईच भयाण वास्तव ,बेकारी,गरिबी,शेतमालाला कवडीमोल भाव,धनदांडग्यांना गावोगांवी दारूचे परवाने वाटून दारुयुक्त गाव नीतीने समाजाला नशेच्या खाईत ढकलने,कर्जबाजारीने शेतकरी आत्महत्या,ढासळलेली अर्थव्यवस्था,रुपयाचं अवमुल्यन,दरडोही उत्पन्नाचा निचांक,दरडोही कर्जाचा उच्चांक, विविधप्रकारच्या टॅक्सने जनतेच्या रक्ताचं शोषण, जनतेच्या घामाच्या पैशाची धार्मिकतेवर अनाठायी उधळण, उद्योगपतींचे कर्ज माफ करून देशावर कर्जाचा डोंगर,आरक्षण,शिक्षण,स्पर्धा परीक्षा खत्म करून लॅटरल एंट्री ने मार्जितल्यांचा उच्च पदावर भरना,… अशा अनेक गंभीर समस्यांनी देश होरपडून निघत असल्याने या ज्वलंत मुद्यांवरून जनतेच लक्ष भरकटवण्यासाठी, राज्याकर्त्यांची नाकामी लपवीण्यासाठी, आपली राजकीय पोळी शेकून घेण्यासाठी काही राज्यकर्त्यांकडून जातीय धार्मिक द्वेषाचे विष ओकून समाजात तेढ निर्माण करून दंगली घडवून जीवितहानी वित्तहानी सार्वजनिक संपत्ती नष्ट केल्या जात आहे. युवकांना धर्मांधतेची नशा पाजून त्यांच्या हाती दगड धोंडे शस्त्र बारूद देऊन त्यांचे आयुष्य बरबाद केल्या जात आहे.या भयानक परिस्थितून समाजाला वाचविण्यासाठी जनजागृती करून समाजाला सावरण्याचं काम जिजाऊ रथयात्रेद्वारा होतं असल्याचे अख्खा महाराष्ट्र अनुभवत आहे.
जिजाऊ रथयात्रेची सुरुवात १८ मार्च २०२५ ला शहाजी राजे भोसले यांचे जन्मस्थळ वेरूळ पासून झाली असून सांगता १ में २०२५ ला पुणे येथील लालमहालात होणार आहे. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी ठिकठिकाणी जिजाऊ रथयात्रेच्या स्वागताला जनतेचा उत्फूर्त प्रतिसाद मिळत.

