संपादक मुनिश्वर बोरकर गडचिरोली.
जिमलगठ्ठा:-केवळ बौद्ध बांधवच नाही तर बहुजननांनी एकत्रपणे येऊन संघर्ष केला तर प्रबुद्ध भारत निर्माण झालाशिवाय राहणार नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे उपकार आम्हा सर्वावर आहेत. त्यांनी सर्व व्यापक समाजासाठी न्याय मिळवून दिला. संविधानामुळे आम्ही शिक्षण , धम्म स्विकारला अश्या प्रकारचे मोलाचे मार्गदर्शन आंबेडकरी विचारवंत नरेन गेडाम यांनी रसपल्ली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचे अनावरण कार्यक्रमा प्रसंगी केले . अहेरी तालुक्यातील जिमलगट्ठा जवळील अतिदुर्गम रसपल्ली येथील पंचशिल बुद्ध विहारा समोर विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व त्यागमुर्ती माता रमाई यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे लोकार्पण सोहळा पुज्य भन्ते सेवकमहाथेरो नागपूर यांच्या हस्ते विधिवत अनावरण झाल्यानंतर धम्मदेशना व मार्गदर्शन कार्यक्रम आंबेडकरी विचारवंत नरेन गेडाम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणुन संविधान फांऊडेशन चे गौतम मेश्राम रिपब्लिकन पार्टी चे जिल्हाध्यक्ष प्रा. मुनिश्वर बोरकर , ⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️

⏯️बसपा प्रभारी शंकर बोरकुट , रिपाई नेते गोपाल रायपूरे चंद्रपूर , सामाजीक कार्यकर्ता व माजी अंगणवाडी पर्यवेक्षक शुशीला भगत , झोडे सर , वेकंटी दुर्गम , नंदकिशोर दुर्गे , जावेद अल्ली शेख , नंदेश्वर मेश्राम , रतन दुर्गे , नागेश मडावी आदि लाभले होते. याप्रसंगी गौतम मेश्राम यांनी संविधान पूर्वी काय होतो व संविधान मिळाल्या नंतर कसे झालो याची विश्वत माहीती देऊन ते पुढे म्हणाले की , शासनकर्ती जमात संविधानाचा आदर केला तर राज्य सुरळीत चालु शकतो. या प्रसंगी प्रा. मुनिश्वर बोरकर म्हणाले की अख्या गडचिरोली जिल्ह्यात डॉ. आंबेडकर नगर नावाचे गाव नाही ते रसपल्ली गावकऱ्यांनी करून दाखविले. अतिदुर्गम भागातही साजेशे असे बुद्ध विहार व बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना मताचा जोगवा मागणाऱ्या कोणत्या कांग्रेस – भाजपाच्या खासदार – आमदारकडून भिख म्हणून न घेता धम्म दात्याकडुन व लोकवर्गणीतून बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना व कार्यक्रम केल्यामुळे आंबेडकर नगरवासीयांचे अभिनंदन केले. कार्यक्रमाचे संचलन बोरकुट यांनी तर आभार नंदेश्वर मेश्राम यांनी मानले. कार्यक्रमास सदर परिसरातील बहुसंख्य नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते.

