संपादक प्रा. मुनिश्वर बोरकर
गडचिरोली:- छत्तीसगड भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती अवसर पर भव्य समाज प्रबोधन समारोह शुक्रवार दि. १८ एप्रिल २०२५ दुपारी १२ वाजता क्षेत्रीय बौद्ध समाज संघटन क्षेत्र औंधी (छत्तीसगड ) येथे आयोजित करण्यात आलेले आहे.
कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक म्हणून प्रा. जावेद पाशा कुरेशी , अध्यक्ष भारतिय मुस्लिम परिषद नागपूर हे असुन कार्यक्रमाचे अध्यक्ष धनराज बाम्बोडे अध्यक्ष क्षेत्रिय बौद्ध समाज औंधी तर प्रमुख पाहुणे म्हणुन महेंद्र शाहु भारतीय किसान युनियन छत्तीसगड , रिपब्लिकन पार्टी चे गडचिरोली जिल्हाध्यक्ष प्रा. मुनिश्वर बोरकर , रिपाई महिला आघाडी प्रमुख ॲड. प्रियंका चव्हाण चंद्रपूर , चंदन उसारे सरपंच औंधी , सामाजिक कार्यकर्ता संतोषी ठाकुर बालोद , ज्योती मोहुर्ले धानोरा , दिनेश उसेंडी गोंड समाज अध्यक्ष मानपूर , प्रा. सविता तुलावी राजनांदगांव , पुप्पा आत्राम जनपद सदस्य मानपूर , किशोर धवले कोरची निलेश उराडे , गडचिरोली आदि लाभणार आहेत. रात्रौ ८ वाजता गायक आनंद आलोणे , ज्ञानेश्वर मुजुमकर गडचिरोली यांच्या भिम गिताचा प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. तरी क्षेत्रिय बौद्ध समाज मंडळ सर्कल च्या कार्यकर्त्यांनी बहुसंखेनी उपस्थित राहण्याचे आवाहन क्षेत्रिय बौद्ध समाज मंडळ औंधी च्या पदाधिकाऱ्यांनी केलेले आहे.

