✍️मुनिश्वर बोरकर
संपादक

चामोर्शी:- विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र मार्कंडादेव येथे महाशिवरात्रीच्या निमित्ताने भव्य जत्रेचे आयोजन करण्यात आले होते. या पावन दिवशी, श्री मार्कंडेश्वर मंदिरात महापूजेचा मान माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोकजी नेते यांनी सपत्नी सौ. अर्चनाताई नेते यांच्यासह प्राप्त केला.
संध्याकाळी विधीवत पूजा, अभिषेक व आरती संपन्न झाली. शंखनाद, मंत्रघोष आणि “हर हर महादेव” च्या जयघोषात संपूर्ण मंदिर परिसर भक्तिमय झाला होता. या मंगलमय वातावरणात अशोकजी नेते यांनी भगवान भोलेनाथाच्या चरणी नतमस्तक होत सर्वांसाठी सुख, समृद्धी आणि शांतीची प्रार्थना केली.
यावेळी भाजपा जिल्हा महामंत्री प्रकाशजी गेडाम, सहकार आघाडी जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक आशिषभाऊ पिपरे, नगरपरिषद चामोर्शीच्या महिला व बालकल्याण सभापती सोनाली पिपरे तसेच अनेक श्रद्धालू व मान्यवर उपस्थित होते.
मार्कंडादेव येथे महाशिवरात्रीच्या निमित्ताने हजारो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. मंदिराच्या प्रांगणात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मंत्रोच्चार, आरती आणि पूजेच्या माध्यमातून संपूर्ण परिसर शिवमय झाला होता.
भगवान शंकराच्या कृपेने संपूर्ण समाजात शांती, समृद्धी आणि आनंद नांदावा, हीच शिवभक्तांची परम प्रार्थना!
