संपादक प्रा. मुनिश्वर बोरकर गडचिरोली.
कुरखेडा:-गुरुदेव सेवा फाऊंडेशन व श्री. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन आणि उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष मंत्रालय मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आंवान महाविद्यालय आंधळी फाटा येथे महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आलेले होते.

सदर शिबिरामध्ये निःशुल्क नेत्र तपासणी, रक्तदान, मधुमेह, स्त्रीरोग, कान, नाक, घसा, सिकलसेल, कॅन्सर, रक्तदाब, मोफत चष्मा वाटप, जनरल, मेडिसीन इत्यादी तपासण्या पार पडल्या.सदर कार्यक्रमाचे उद्घाघटक मंगेश मंदाकिनी नरसिंह चिवटे (कक्षप्रमुख उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष तथा विशेष कार्यकारी उपमुख्यमंत्री कार्यालय मंत्रालय मुंबई) . तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. परशुराम खुणे साहेब (जेष्ठ झाडीपट्टी रंगभूमी कलाकार भारत सरकार द्वारा पद्मश्री पुरस्काराने सन्मानित) . प्रमुख अतिथी मा. डॉ. सुगत दादा चंद्रिकापुरे (संघटक भंडारा, गोंदिया जिल्हा शिवसेना)मा. डॉ. माधुरी किलनाके (जिल्हा शल्य चिकित्सक गडचिरोली) मा. डॉ अमित ठमके साहेब (उपजिल्हा रुग्णालय कुरखेडा) मा. सुजाता वाडीवे (तालुका वैद्यकीय अधिकारी कुरखेडा.)* आदि लाभले होते.यावेळी मंगेश चिवटे साहेब म्हणाले की, चार पाच दिवसांआधी माझा नागपूर चंद्रपूर वर्धा जिल्ह्यातील दौरा ठरला उपमुख्यमंत्री मा ना श्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या ६० व्या वाढदिवसानिमित्त संपुर्ण महाराष्ट्रात आरोग्य शिबिर आयोजित करण्यात येत आहेत परंतु गडचिरोली जिल्हातील दुर्गम भागात शिबिर होत नव्हते. त्यामुळे मी पहिला फोन माझे मित्र श्री कृपाल दादा मेश्राम यांना केला आणि त्यांना विनंती केली की आपण गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागात आरोग्य शिबिर आयोजित करावे त्यांनी माझ्या विनंतीला मान देऊन आज या ठिकाणी मोफत महा आरोग्य शिबिर महा रक्तदान शिबीर मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू व मोफत चष्मे वाटप शिबिर आयोजित केले त्याबद्दल कृपाल दादांचे अभिनंदन व आभार राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री यांनी वारंवार संकटकाळी मदत पोहोचवली आहे. आता देखील त्यांच्या आदेशाने व खासदार डॉ. श्रीकांतदादा शिंदे यांच्या सूचनेनुसार अनेक दुर्गम भागात वैद्यकीय सेवा शिवसेना वैद्यकीय मदत पोहोचवत आहे.येणाऱ्या काळात सुद्धा कृपाल दादा श्री गुरुदेव सेवा फाउंडेशन च्या माध्यमातुन गडचिरोली जिल्ह्यातील अनेक दुर्गम ठिकाणी महा आरोग्य शिबिर आयोजित करतील अशी अपेक्षा केली.यावेळी ५७० रुग्णांची तपासणी करून औषध वाटप करण्यात आले २२३ रुग्णांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले ४५ रुग्णामध्ये मोती बिंदू आढळुन आला त्यांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया नागपूर येथील प्रसिद्ध महात्मे हॉस्पिटल येथे करण्यात येणार आहे मोती बिंदू रुग्णांची नागपूर ला जाणे येणे राहणे जेवण सर्व श्रि कृपाल मेश्राम अध्यक्ष श्री गुरुदेव सेवा फाउंडेशन मार्फत करण्यात येणार आहे .२४ रक्त दात्यांनी रक्तदान केले रक्तदान करणाऱ्या सर्व व्यक्तींना १० लक्ष रुपयांचे विमा कवच मोफत देण्यात आले व कार्यक्रमाला उपस्थित सर्व विद्यार्थीगण, पालक, नागरिक, शाळेतील मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सर्वांचे सहकार्य लाभले.

