कोरपणा:-जनजातीय कल्याण योजनेअंतर्गत रूपांना तालुक्यातील ग्रामपंचायत मांडवा अंतर्गत टांगारा येथील कोलाम समूहांना सन 2024 25 मध्ये मोठ्या प्रमाणात घरकुल मंजूर झाली होती व ही बांधकामे जलद गतीने व्हावे म्हणून शिंदे नामक एका ठेकेदाराला ही काम सोपवण्यात आली होती परंतु कोलामांच्या अज्ञानपणाचा व साध्या भोळ्यापणाचा फायदा घेण्याचे हेतूने मार्चपासून थोडेफार काम करून पहिल्या व दुसऱ्या हप्त्याच्या रकमा सुभाष शिंदे यांनी आपल्याकडे घेतले होते गेल्या दोन महिन्यापासून लाभार्थी चक्रा काढून त्रस्त झाले ही बाब राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव आबिद अली यांना भेटून लाभार्थ्यांनी अडचण सांगितली याबाबत गटविकास अधिकारी मुख्य कार्यपालन अधिकारी यांच्याकडे जनजातीय कल्याण योजनेचे घरकुलाचे काम रखडले या मथळ्याखाली या मथळ्याखाली वर्तमानपत्रात बातम्या देखील प्रसिद्ध झाल्या होत्या याची दखल घेत दिनांक २३/६/२०२५ला पंचायत समिती नूडल अधिकारी सह संपूर्ण ताफा टांगारा गावाला पोहोचलातिथेच ठेकेदार शिंदे उपस्थित राहून उपस्थित राहून मंजूर असलेल्या लाभार्थी रेणुका मळावी सुभाष आत्राम रमेश आत्राम जयतु मळावी रमेश सिडाम यांच्या घराचे बांधकाम सुरू करण्यात आले यासाठी आवश्यक ते मजूर मिस्तरी तसेच साहित्य आणून कामाला आज सुरुवात केली यावेळी आबिद अली भीमा काळे नोडल अधिकारी पंचायत समितीचे सुजित बेलेकर मयूर कोटरंगे ग्रामसेवक शेख मुस्ताक तसेच गावातील मारुती असेपल्ली भीमराव शिळाम संतोष मळावी यांचे सह लाभार्थी उपस्थित होते आठ दिवसात संपूर्ण घरे बांधकाम पूर्ण करून देण्यात येईल अशी ग्वाही ठेकेदार शिंदे यांनी दिली व लगेच कामाला सुरुवात केल्यामुळे पावसाळ्याच्या झळा पासून लाभार्थ्यांचा बचाव झाला व आबिदअली यांचे प्रयत्न सार्थकी ठरले💢💢💢💢💢💢💢