व्येकटेश चालुरकर
तालुका प्रतिनिधी अहेरी
अहेरी जिल्हा परिषद प्राथमिक सेवानिवृत्त शिक्षकांच्या व कुटुंब पेंशन धारकांच्या समस्यांचे निर्मूलन करण्यासाठी 2022 रोजी स्थापन झालेल्या संघटनेचा वार्षिक स्नेह मिलन सोहळ्याचे आयोजन स्थानिक वीर ब्रम्हांगारु मंदिराच्या आवारात आज करण्यात आले. त्याचे अध्यक्ष जिल्हाध्यक्ष दिलीप मडावी हे होते.मिलन सोहळ्याला 97 जिल्हा परिषद प्राथमिक सेवा निवृत्त शिक्षक व 78 कुटुंब धारक पेन्शनर्स यांनी वर्षातून एकदा चंग बांधला की सेवानिवृत्ती शिक्षक एक परिवार म्हणून कार्यक्रम घ्यावा त्या अनुषंगाने आज हा कार्यक्रम घडवून आणण्यात आले आहे. जिल्हा परिषद शिक्षकांच्या वार्षिक निवड श्रेणी गटविमा पेन्शन बाबत तक्रारी, उपदान व अंशराशीकरण, पीपीएफ, शासनाचे जीआर व इतर माहिती, वेतन आयोगाचे हप्ते मिळण्याबाबत, प्रवास भत्ता मिळण्याबाबत, संघटना नेहमी तयार राहत असल्याचे मत संघटनेचे तालुकाध्यक्ष नानाजी कत्रोजवार यांनी प्रस्तावनातून सांगितले.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष तसेच जिल्हाध्यक्ष दिलीप मडावी यांनी मत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या उद्घाटिका शीलाताई डोफे तर प्रमुख अतिथी म्हणून नरेंद्र कोत्तावार सामोर्शी हे उपस्थित होते.
कार्यक्रमाचा उद्देश अशोक निकुरे यांनी सांगितला.यावेळी येलेश्वर कोमरेवार, विलास मस्के, लक्ष्मीबाई कुलमेथे येथे बबलू सदमेक व ईतर परिषदेचे सेवानिवृत्त शिक्षक व कुटुंब धारक सुद्धा कर्मचारी उपस्थित होते.संचालन पुसलवार यांनी केले
