संपादक मुनिश्वर बोरकर
गडचिरोली:-तथागत बुद्ध बुद्धवासी होण्यापूर्वी आनंदने विचारले की आता आपला वारसदार कोण , तेव्हा बुद्ध म्हणाले की ‘ शुध्दोधन ,यशोधरा , राहुल , गौतमी , नंद’ आनंद असतांना सुद्धा बुद्ध म्हणाले की, बौद्ध धम्म हाच माझा वारसा आहे. एवढा त्याग बुद्धाने केला. आणि सम्राट अशोक ‘ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध धम्म जगभर पसरविला. आता बुद्धगया महाबोधी महाविहार मुक्त आंदोलन करावयाचे आहे. हिच आमची समस्या आहे. यासाठी राष्ट्रीय संघटना बनवून एकत्र येवून बुद्धगया मुक्ती आंदोलनाचा लढा लढायचा आहे . यासाठी आपण सज्ज रहावे अश्या प्रकारचे मोलाचे मार्गदर्शन 








बाबा हस्ते राष्ट्रीय समिक्षा प्रभारी बामसेफ दिल्ली यांनी रेस्ट हाऊस गडचिरोली येथे जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिबिरात केले. सदर प्रशिक्षण शिबिराचे उदघाटक रिपब्लिकन पार्टी चे जिल्हाध्यक्ष प्रा. मुनिश्वर बोरकर यांचे हस्ते झाले तर प्रमुख अतिथी म्हणुन प्रा. चोपराम कांबळे , आरपिआय नेते गोपाल रायपूरे , रविंद्र कोवे महाराज कोनसरी , MIM नेत्याआयशा अल्ली शेख , रिपाई युवा नेता विकास दहिवले सदर प्रशिक्षण शिबिराचे आयोजक बामसेफ जिल्हाध्यक्ष भोजराज कानेकरआदिची प्रमुख उपस्थिती होती.
हस्ते पुढे म्हणाले की , आपण सर्व मुलनिवासी असल्यामुळे सर्वांनी एकत्र येऊन लढल्याशिवाय आपल्या समस्या सुटणार नाही. साऱ्या समस्याचे कारण EVM आहे म्हणुन ‘ चलो बुथ की और ‘असे प्रशिक्षणात सतत तिन तास प्रबोधन केले.
सदर प्रशिक्षण शिबिरात दामोधर शेन्डे , दशरथ साखरे , मारोती भैसारे जनार्धन ताकसांडे , उद्धवराव बौद्ध . प्रमोद बांबोळे , प्रमोद राऊत , पुंडलिक शेंडे. खेमदेव हस्ते , चोखोबा ढवळे , दिलीप नंदेश्वर , मोरेश्वर लाळे , यशवंत वंजारे , कामराज लोखंडे , मनोज खोब्रागडे , डोमाजी गेडाम , प्रेमदास रामटेके ‘ श्रावण मेश्राम , नरेंद्र शेंडे , लवकुंश भैसारे , मोरेश्वर निमगडे , रमेश डोंगरे नामदेव दुधे ‘ जैराम उंदिरवाडे , सुरेश मेश्राम , दिवाकर मेश्राम , मनोज बारसिंगे यज्ञराज जनबंधु, विनोद सेलोटे , आनंद अलोणे ,नाजुक भैसारे ‘ लता भैसारे ‘ सुषमा भडके , लता रामटेके ‘ अमिता भैसारे ‘ प्रेमलता कानेकर , लिला कोटांगले ‘ अरुणा उंदिरवाडे , सुकेसिनी रामटेके , शशीकला सहारे अहिल्या सहारे ‘ रोजा घांगरगुंडे, विभा खेवले , हेमलता लाळे , गुणाबाई भोयर , हेमलता गोवर्धन , अनुसया सहारे , आदि सहीत बहुसंख्य नागरिक प्रामुख्याने प्रशिक्षणास उपस्थित होते.

