राजेश येसेकर तालुका : प्रतिनिधी भद्रावती
भद्रावती :- अवैध रेती तस्करी करणाऱ्या तीन ट्रॅक्टरवर भद्रावती गौण खनिज पथक महसूल विभागाने कारवाई करीत सदर ट्रॅक्टर तहसील कार्यालयात जमा केले आहे.
👉सदर कारवाई महसूल विभागाच्या गौण खनिज पथकातर्फे दिनांक 22 रोज शनिवारला पहाटे तीन वाजताच्या सुमारास चिरादेवी – कोची रोडवर करण्यात आली. मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे महसूल विभागाच्या गौण खनिज पथकाद्वारे पहाटेच्या वेळेस घटनास्थळाजवळ सापळा लावण्यात आला. त्यानंतर या तिन्ही ट्रॅक्टर वर कारवाई करण्यात आली व ट्रॅक्टर तहसील कार्यालयात जमा करण्यात आले. सदर तिनही ट्रॅक्टरवर नंबर नसल्याचे सांगण्यात आले. ही कारवाई तहसीलदार राजेश भांडारकर यांच्या नेतृत्वात मंडळ अधिकारी समीर वाटेकर तलाठी वाघमारे मॅडम शिपाई निर्दोष फुलबोगे गौण खनिज पथक यांनी केले सदर ट्रॅक्टर अण्णा खुटेमाटे, देविदास खुटेमाटे व मोहन दर्वे राहणार पिपरी यांच्या मालकीची असल्याचे सांगण्यात आले.पुढील कारवाई भद्रावती महसूल विभाग करीत आहे.

