संपादक मुनिश्वर बोरकर गडचिरोली.
व्याहाड:-सावली तालुक्यातील बौद्ध समाज मंडळ मोखाळा (व्याहाड ) येथे तथागत बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना सोमवार दि. १९ मे २०२५ ला दुपारी १२ वाजता पुज्य भदंन्त ज्ञानज्योती महाथेरो संघारामगिरी यांचे हस्ते विधिवत प्रतिष्ठापणा होणार आहे. दुपारी १ वाजता धम्मदेशना व मार्गदर्शन होणार असून सदर कार्यक्रमाचे उदघाटक म्हणुन आमदार विजयभाऊ वडेट्टिवार ब्रम्हपुरी विधानसभा तर सह उदघाटक म्हणुन माजी खासदार अशोक नेते चिमुर लोकसभा क्षेत्र असुन कार्यक्रमाचे अध्यक्ष खासदार डॉ. नामदेवराव किरसान तर दिप प्रज्यलन ॲड. राम मेश्राम माजी जि.प. सदस्य गडचिरोली , सरपंच प्रणिताताई म्हशाखेत्री , भाजपाचे चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष अविनाश पाल यांचे हस्ते होणार आहे. सदर कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणुन रिपब्लिकन पार्टी जिल्हा चंद्रपूर चे अध्यक्ष गोपाल रायपूरे , शेडयुल्ट कॉस्ट फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. विनय बांबोळे , रिपाईचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष प्रा. मुनिश्वर बोरकर , सामाजिक कार्यकर्ता प्रा. श्याम रामटेके , रिपाई महिला आघाडी प्रमुख ॲड. प्रियंका चव्हाण चंद्रपूर , सामाजिक कार्यकर्ता प्रा. अपेक्षा पिंपळे चंद्रपूर आदि लाभणार आहेत.
रात्रौ ९ वाजता समतेचं विद्रोही वादळ , गायक उपेंद्र वनकर यांचे प्रबोधनात्मक कार्यक्रम होइल. सदर कार्यक्रमाचे उदघाटक संचालक संदिपभाऊ गडुमवार , तर प्रमुख अतिथी म्हणुन माजी जि.प. सदस्य दिनेश चिटनुरवार , माजी बांधकाम सभापती संतोष तंगड पल्लीवार निखिलभाऊ सुरमवार उदय गडकरी सावली हे राहणार आहेत .
सदर कार्यक्रमास बहुसंखेनी उपस्थित राहण्याचे आवाहन मंडळाचे अध्यक्ष टिकेश गेडाम ‘ उपाध्यक्ष राहुल चुनारकर , सचिव राजेश थेरकर तर कोषाध्यक्ष विनायक दुधे मोखाळा यांनी केलेले आहे.❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️


