संपादक प्रा. मुनिश्वर बोरकर गडचिरोली
गडचिरोली:-केंद्र व राज्य शासनाच्या असंवैधानिक आणि कामगार विरोधी धोरणामुळे सफाई कामगारांनी संप पुकारला होता. सदर मागण्यांचे निवेदन न. प. सिओ मार्फतीने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांना पाठविले.

मागण्या – खाजगीकरण बंद करून , कांत्राटी भरती बंद करावी व कामगारांना शासकिय सेवेत सामावुन घ्यावे ( 2) कामगारांना आरक्षण लागु करावे (3) कांत्राटी कामगारांना पुर्वलक्ष प्रभावाने किमान वेतन घ्यावे. (४) नविन कामगार धोरणातील कामगार विरोधी धोरण रद्द करण्यात यावेत ( ५) स्वतंत्र मजदुर युनियनला आंतरराष्ट्रीय संघटनेचा दर्जा देऊन भारतीय राष्ट्रीय संघटनेत प्रतिनिधित्व देण्यात यावेआदि मागण्याचे निवेदन नगर प्रशासन मार्फत राज्याचे मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांचेकडे पाठविण्यात आले.
एक दिवसीय लक्षणिय संपात व आज दि. ९ जुलैला सर्व सफाई कामगार नगर परिषद गडचिरोली येथे जमा होवून निवेदन दिले. यात जितेंद्र खोब्रागडे अध्यक्ष सफाई कामगार संघटना जिल्हा गडचिरोली , निलेश मेश्राम सरचिटणीस सफाई कामगार संघटना गडचिरोली , निलज रामटेके . निलकंठ भरडकर , विनोद मेश्राम , विलास वादिकर ,देवनाथ चन्नेवार , रमेश ठाकरे , विलास वाढई ,राजु भांडेकर , साईनाथ कन्नाके , जितेंद्र मुनंघटीवार ‘ मारेश्वर मडावी ‘ प्रदिप खंडारे , मोरेश्वर मडावी , विनोद मेश्राम , प्रकाश नैताम आदि सहीत बहुसंख्य सफाई कामगार उपस्थित होते.


