दिनेश झाडे
मुख्य संपादक

गडचांदूर:-कोरपना तालुक्यातील गडचांदूर स्थित अल्ट्राटेक (माणिकगड सिमेंट युनिट) शहराच्या काठावर असून येथे पूर्वी एक युनिट कार्यरत होते मात्र नव्याने विस्तार करून दुसरे युनिट कार्यान्वित झाल्याने सिमेंट प्रकल्पालगत १०० मीटर अंतरावर थुट्रा शेत शिवारातील ३५.४० शेतकऱ्याच्या शेतातील कापूस,तूर,मिरची,सोयाबीन,गहू,चना ह्या खरीप व रब्बी पिकावर धुळीचे कण वायू प्रदुषणामुळे शेत पिक उध्वस्त होत असल्याने थुट्रा,गोपाळपूर,गडचांदूर येथील शेतकरी संकटात सापडले आहे जमिनीत धुळीचे कण सिमेंट पावडरमुळे जमिनीत कार्बन प्रमाण वाढल्याने जमीन नापीक व उत्पादन क्षमता घटली आहे पिकावर धूळ असल्याने मजूर कामावर येत नाही जमीन नागरिकांनी व वाहितीसाठी कठीण झाल्या कंपनीवर प्रदूषण नियंत्रण मंडळाचे वचक नसल्याने कंपनीकडून रात्रौच्या अंधारात धूळ सोडल्या जात असल्यामुळे माणिकगड सिमेंट कंपनी लगत असलेल्या १ ते २ कि.मी भागातील शेतकरी कर्जबाजारी व शेती उत्पादनासाठी खत-बियाणे,औषधीचा खर्च सुद्धा निघत नसल्याने आदिवासी बहुल शेतकरी संकटात सापडला व शेतकरी साधे-भोळ्या शेतकऱ्यांची कंपनी व्यवस्थापन फसवणूक करित असल्याने मोठ्या प्रमाणात धूळ व वायू प्रदुषणाचा फटका शेतकऱ्याना विळखा घातला आहे यामुळे उगवण शक्ती बियाणे होत नाही फळधारणा होत नाही उत्पादनावर परिणाम झाडण गावाचे आरोग्य घरभर धुळीच्या कनामुळे किडणी,दमा,अस्थमा,क्षयरोग,मधुमेह,रक्तदाब आजाराने ग्रस्त आहेत गडचांदूर,थुट्रा,गोपाळपूर या गावात वायू प्रदुषणाचा विळखा घातल्याने धुळीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत मात्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून कंपनी विरोधात ठोस कार्यवाही होत नसल्याने कंपनीच्या मुजोरीने प्रदुषणाचा फटका नागरिकांना सहन करावा लागत आहे यापूर्वी कोल्प वॉशरीत मुळे पांढरपौणी शेतकऱ्याना नुकसान भरपाई दिली तसेच यवतमाळ जिल्ह्यातील मुकुटबन येथील संताप शेतकऱ्यांनी आर.पी.पी.एल कंपनी कडून नुकसान भरपाई घेतली राजुरा,कोरपना तालुक्यातील सिमेंट उघोगामुळे शेती संकटात व भविष्यात शेती करणे कठीण असल्याने कंपनीच्या वनमातीच्या बळी शेतकऱ्याचा घेतला जात आहे कंपनीच्या वायू,ध्वनी प्रदुषणावर त्वरित आळावा घालावा शासकीय नियमाच्या ४ पट आर्थिक नुकसान भरपाई प्रति ५४२०० चोपन हजार दोनशे शेतकऱ्याना देण्यात यावे अशी मागणी जनसत्याग्रह संघटनेचे आबिद अली,अनिल मडावी,वामन कोरांगे,छत्रपती किन्नाके यांनी जिल्हाधिकारी,प्रदूषण नियंत्रण मंडळ,तहसिलदार,तालुका कृषी अधिकारी यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.
