मुलीवर अत्याचार करुन तिचा खुन करण्यात आल्याचा आरोप मृतक मुलीच्या कुटुंबीयानी केला.
राजेश येसेकर ✍️ तालुका प्रतिनिधी भद्रावती
भद्रावती : तालुक्यातील चोरा येथील शेत शिवारात एका 14 वर्षीय मुलीचा मृतदेह विहिरीत आढळून आल्याने परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे.सदर हि घटना दि. 21 मार्च रोज शुक्रवारला पहाटे पाच वाजताच्या दरम्यान उघडकीस आली. सदर या घटनेची माहिती भद्रावती पोलीसांना प्राप्त होताच भद्रावती पोलिसांनी घटनास्थळी जाऊन घटनेचा पंचनामा केला. व मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय भद्रावती येथे आणला. मात्र मृतक मुलीच्या कुटुंबीयांनी मुलीवर अत्याचार करुन तिचा खुन करण्यात आल्याचा संशय व्यक्त केल्यानंतर मृतदेहाला शवविच्छेदनासाठी जिल्हा ग्रामीण रुग्णालय चंद्रपुर येथे पाठविण्यात आले आहे. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता वरिष्ठ पोलीस अधीकाऱ्यांनी भद्रावती पोलीस स्टेशनला भेट दिली. या घटनेमुळे काहि काळ पोलीस स्टेशन परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. शवविच्छेदन अहवालानंतर या घटनेची सत्तता समोर येईल. या घटनेचा पुढील तपास ठाणेदार लता वाढिवे यांच्या मार्गदर्शनाखाली गजानन तुपकर, अनुप आष्टुनकर, विश्वनाथ चुदरी, जगदिश झाडें, निकेश ठेंगे, खुशाल कावडे, रोहित चिटगीरे, योगेश घाटोळे, भद्रावती पोलीस करीत आहे.

