संपादक मुनिश्वर बोरकर गडचिरोली
गडचिरोली:-रेगडी ते देवदा रोड तयार करतांना रस्त्याचा कडेला दोन्ही बाजुने बाहेरून मुरुम आणुन पसरावा लागतो परंतु संबंधित ठेकेदारांनी आपले पैसे वाचविण्याकरीता बिना टिपीचे जंगलातीलच मुरुम वापरला यात वनविभागाचे दुर्लक्ष की मिलीभगत अश्या ठेकेदारावर व वनविभागाच्या कर्मचाऱ्यावर Dfo ने त्वरीत कारवाई करावी अन्यना वनविभाग कार्यालय गडचिरोली समोर दि. १६ जुन पासुन उपोषण करण्याचाईशारा जनकल्याण चे अध्यक्ष रवि सेलोटे पोर्ला , विलास भानारकर , मनोज भानारकर आदिनी दिलेला आहे.
रेगडी ते देवदा डाबरीकरणाचा रोड ठेकेदारांनी थातुरमातूर पुर्ण केला असुन रस्त्यांच्या दोन्ही बाजुला रस्त्याच्या कडेला दुसरीकडून मुरुम आणुन कडा भरण्याचे होते परंतु संबंधित ठेकेदारांनी चक्क जंगलातून व रस्त्याच्या बाजुचाच अवैध मुरुम आणुन रस्त्याची मुरमाने कडा भरला आहे. यात संबंधित वनपाल व वनरक्षक यांचे दुर्लक्ष नव्हे तर मिलीभगत आहे असे कळते. तेव्हा संबंधित ठेकेदारांना काळ्या यादीत टाकून अवैध उत्खननाची चौकशी करून वनपाल व वनरक्षक यांना निलंबित करावे अशी मागणी व तक्रार रवि सेलोटे , विलास भानारकर , मनोज भानारकर यांनी मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक ) मुख्य वनविभाग कार्यालय यांचेकडे तक्रार केली होती परंतु अजुनपर्यंत कोणतीच कारवाई न झाल्यामुळे विलास सलोटे दि. १६ जुन पासुन मुख्य वनविभाग कार्यालय गडचिरोली कार्यालया समोर उपोषण करणार आहेत अशी माहितीही मुख्य वनसंरक्षक गडचिरोली यांच्याकडे केलेली आहे.

