✍️दत्तात्रेय बोबडे
उपसंपादक
भद्रावती:- भद्रावती तालुक्यातील छत्रपती शिवाजी महाराज उत्सव समिती आष्टा द्वारा आयोजित शिवजयंती महोत्सव १९ फेब्रुवारी २०२५ ला डॉ. विजय देवतळे जिल्हा अध्यक्ष खैरे कुणबी समाज चंद्रपूर यांच्या अध्यक्षतेत,शिवमहोत्सवाचे उदघाटक तथा सत्कारमूर्ती करणभाऊ देवतळे आमदार वरोरा-भद्रावती निर्वाचन क्षेत्र यांचे हस्ते, मा. दत्ताभाऊ बोरेकर सभापती कृ.उ.बा.समिती वरोरा यांचे प्रमुख उपस्थितीत, शिव व्याख्याते रामचंद्र सालेकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनात मोठया उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमात नवनिर्वाचित युवा आमदार करण देवतळे यांचा ग्रामस्थाकडून जाहीर सत्कार करण्यात आला,याप्रसंगी प्रमुख शिव व्याख्याते रामचंद्र सालेकर यांनी शिवराज्याच्या शिवनीतीचा जगातल्या अनेक देशांनी आदर्श घेऊन प्रगती केल्याचे उदाहरणासह स्पष्ट केले, भारतानेही धर्मनिरपेक्ष, विज्ञानवादी,बहुजन प्रतिपालक, शेतकऱ्यांचे, स्त्रि सन्मानाचे महामेरू असलेल्या छत्रपती शिवरायांचे अनेक दाखल्या द्वारा शिवचरित्र आपल्या व्याख्यानातून मांडून “शिवचरित्रातच भारताला महासत्ता बनविण्याची ताकद असल्याचे सांगितले.”
दत्ताभाऊ बोरेकर यांनी आपल्या भाषणात शिवमहोत्सव हा कोण्या विशिष्ट जातीधर्माचा उत्सव नसून अखिल मानवजातीचा उत्सव असल्याचे सांगितले. सत्काराला उत्तर देतांना आमदार करण देवतळे यांनी गावाच्या समस्या जाणून घेऊन शिवरायांच्या प्रेरनेने आपल्या गावाच्या व वरोरा-भद्रावती क्षेत्राच्या विकासासाठी सदैव तत्पर राहुन अहोरात्र प्रयत्नरत राहिल असी ग्वाही दिली.अध्यक्षीय भाषणात डॉ विजय देवतळे यांनी शिवरायांचा आदर्श प्रत्येकानी मनामनात रुजवून स्वतःच आदर्श जीवन,आदर्श गांव घडवण्यासाठी प्रत्येकानी संकल्प करून शिवजयंती साजरी करण्याचे आवाहन केले.शिवमहोत्सव कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून मारोती गायकवाड, किशोर डोमकावळे, भाष्कर कुडे, विजय धंद्रे, मोरे सर, चांगदेव रोडे, सुहास बहिरे, दिवाकर शेंडे, विनोद तिवाडे, प्रभाकर तेलंग, नरेश तुमडे, ज्ञानेश्वर तुंबडे, उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक चांगदेव रोडे सरपंच आष्टा यांनी केले, कार्यक्रमाचे संचालन तर आभार रोशन भोयर यांनी मानले.
शिवमहोत्सव कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी छत्रपती शिवाजी महाराज उत्सव समिती आष्टा च्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.

