संपादक मुनिश्वर बोरकर गडचिरोली.
गडचिरोली:-डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंती निमित्य समाज प्रबोधकार अंजली दिदि भारती गुरुवार दि. १० एप्रिल २०२५ रोजी संविधान चौक , रेड्डी गोडावून जवळ गडचिरोली येथे रात्रौ ८ वाजता संविधान प्रबोधन भिमगिताचा सदाबहार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.

सदर कार्यक्रमाचे उदघाटक माजी मंत्री तथा आमदार विजयभाऊ वडेट्टिवार हे असुन कार्यक्रमाचे अध्यक्ष खासदार नामदेव किरसान तर प्रमुख अतिथी म्हणुन आमदार रामदास मसराम, माजी जि.प. सदस्य ॲड. राम मेश्राम राष्ट्रवादी कांग्रेसचे जिल्हाध्यक्ष रविभाऊ वासेकर , कांग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे , माजी जि.प. उपाध्यक्ष मनोहर पाटिल पोरेटी, आरपिआय चे जिल्हाध्यक्ष प्रा. मुनिश्वर बोरकर , कांग्रेसच्या महिला आघाडी प्रमुख अँड. कविता माहोरकर , कांग्रेस नेते प्रा. राजेश कात्रटवार , माजी प.स. सदस्य तथा प्राचार्य हेमंत रामटेके , नगरसेवक शतिश विधाते , राकेशभाऊ रत्नावार , प्रा. पंडित फुलझेले , इंजि. हरिष ढेभुर्ण , सामाजिक कार्यकर्ता राकेश नागरे उमेशभाऊ वासाडे आदि लाभणार आहेत.
तरी सदर कार्यक्रमास बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन कॉन्ट्राक्टर संदिप बेलखेडे , सामाजिक कार्यकर्ता किशोरभाऊ वडेट्टिवार तसेच संविधान चौक मित्र मंडळ गडचिरोली यांनी केले आहे.
