राजेश येसेकर ✍️ तालुका प्रतिनिधी भद्रावती
भद्रावती : शहरातील एका 65 वर्षीय वृद्धेने आपल्या राहत्या घरातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शहरातील बंगाली कॅम्प, नेताजी नगर येथे दिनांक दोन रोज बुधवारला दुपारी एक वाजताच्या सुमारास घडली. किरण मनोरंजन मंडल, वय 65 वर्षे असे या मृतक वृध्देचे नाव आहे.

👉मृतक महिला व तिचा पती बंगाली कॅम्प येथे राहतात. घटनेच्या दिवशी पती बँकेतील कामा निमित्त गेले होते. बँकेतून परत आल्यानंतर मृतक महिलेने आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. मृतक महिला ही आजाराने पिडित होती असल्याने या आजाराला कंटाळून तिने आत्महत्या केल्याचे समजते. सदर घटनेची माहिती भद्रावती पोलिसांना प्राप्त झाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी जाऊन घटनेचा पंचनामा केला.पुढिल तपास भद्रावती पोलीस करीत आहे.
