✍️मुनिश्वर बोरकर
संपादक
गडचिरोली:-कुणबी सेवा समिती गडचिरोलीच्या वतीने रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती करमेल शाळेच्या मागे समितीच्या नियोजित जागेत साजरी करण्यात आली. यावेळी समितीचे अध्यक्ष ऍड संजय ठाकरे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस मालार्पण व दीपप्रज्वलन करून प्रतिमेची पूजा करण्यात आली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. मार्गदर्शन करताना एडवोकेट संजय ठाकरे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांचे आयुष्य व त्यांचे व्यक्तित्व जगासाठी एक दीपस्तंभ आहे. शिवरायांचे राज्य खरे लोकाभिमुख राज्य होते तसेच त्यांचे सामाजिक परिवर्तनाचे कार्य आजही जगासाठी प्रेरणा आहे. कार्यक्रमाचे संचालन प्रभाकर भागडकर तर आभार समितीचे सचिव आशिष ब्राम्हणवाडे यांनी मानले कार्यक्रमाला मनोहर हेपट, शेषराव येलेकर, चंद्रकांत शिवणकर, अनिल मंगर, लुमाजी गोहणे, राजेंद्र हिवरकर, दादाजी चूधरी, डॉ. देवेंद्र हिवसे, टिकाराम भोयर, वामनराव भोयर, जितेंद्र नायबनकर, अनिल रक्ताटे, वैशाली खेवले, अलका रक्ताटे, शीला गोहणे, काजल भागडकर, किरण भागडकर, नायबनकर मॅडम, पत्रकार कैलास शर्मा आदी समाज बांधव उपस्थित होते.

