संपादक मुनिश्वर बोरकर गडचिरोली
आरमोरी:-आरमोरी येथे 12 मार्च ला दुसरे आदिवासी महिला साहित्य संमेलन पार पडले.या संमेलनाचे उद्घाटक म्हणून डॉ सरदार सिंग मीना राजस्थान म्हणाले की, आदिवासी समुदाय हा कोणतीही बाब स्विकार करणारा समाज आहे आणि यात अर्धाअधिक महिला समाज आहे.त्यांनी आपल्या गीताच्या माध्यमातून आपली संस्कृती टिकवून ठेवली आहे म्हणुनच आदिवासी संस्कृतिचे संवर्धन हि आदिवासी महिलाच करू शकतो अश्या प्रकारचे मार्गदर्शन कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ सरदार सिंग मिना यांनी केले. आदिवासी महिला साहित्य संमेलन आरमोरी येथे दि. १२ मार्च ला पार पडले यात कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष माजी आमदार डॉ रामकृष्ण मडावी होते संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक उषाकिरण आत्राम यांनी आदिवासी संस्कृतीचे संदर्भ देत धरती व मातृशक्तीचे महत्व सांगितले.कुसुमताई अलाम यांच्या प्रास्ताविकाने सुरुवात झाली.आदिवासी महिलांची स्थिती व भुमिका यावर डॉ वामन शेळमाके भंडारा,डॉ प्रतिभा चौरे देशमुख धुळे, डॉ छाया ऊईके, किर्ती वरठा पालघर यांनी सहभाग घेतला.किर्ती वरठा यांनी सोईन/धवलेरी यावर प्रकाश टाकला.धवलेरी ही जिचा पती मृत झाला असेल ती म्हणजे विधवा स्त्री.विवाह लावून देणारे शुभ कार्य तिच्याकडून केले जाते.आदिवासी समाजात स्त्री विधवा होत नाही सन्मानपूर्वक जीवन जगणे ही आपली संस्कृती आहे.हे त्यांनी स्पष्ट केले.या संमेलनाचे उद्घाटन मोहफुले व धान याचे व क्रांतीवीरांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली.गोंडी पारंपरिक गाणी व कवीसंमेलनाचे अध्यक्ष डॉ प्रविण किलनाके संचालन प्रा रमेश कोरचा यांनी केले. पारंपरिक गाणी जिवंत व टिकुन राहण्यासाठी या साहित्य संमेलनाचे माध्यमातून पहिल्यांदाच हा उपक्रम सुरू केला आहे. वंदना मडावी संगिता राजगडकर आडे मुंबई यांनी प्रथमच कविता संग्रह प्रकाशित केले आहे त्यासाठी त्यांचा सत्कार करण्यात आला.डॉ निळकंठ मसराम, सुनिता उसेंडी सरिता नैताम पोलिस पाटील,मिनाक्षी सेलोकर, कल्पना तिजारे उपस्थित होते.प्रेमिला रामटेके,वनिता मरस्कोल्हे, मीनाताई ठाकरे मसराम, कल्पना सिडाम,सपना कोकोडे महिला बचत गट,प्रा अनिल होळी,सोनु अलाम, गौरव अलाम यांचे सहकार्य लाभले.कार्यक्रमाचे संचालन विलास सिडाम, आभार प्रदर्शन प्रकाश पंधरे यांनी मानले.अनेक जिल्ह्यातील कवी, सामाजिक कार्यकर्ते, साहित्य प्रेमी यांची उपस्थिती होती.वंदना मडावी यांच्या स्वागतगीताने व पारंपरिक गोंडी गीताने कार्यक्रमाला रंगत आणली.अविस्मरणीय असे हे संमेलन पार पडले.गोटुल व्यवस्था मजबूत करणे, आदिवासी भाषा संवर्धन करणे, गोंडी भाषेचा आठव्या परिशिष्टात समावेश करणे, इत्यादी ठराव घेण्यात आले. कार्यक्रमास बहुसंख्य आदिवासी बांधव उपस्थित होते

