संपादक मुनिश्वर बोरकर
अमरावती:-पीपल्स रिपब्लिकन पार्टी द्वारा विदर्भव्यापी धम्म लढा चेतना अभियान दि. २० मार्च २०२५ दुपारी १ वाजता पवित्र धम्मस्थळ भीमटेकडी कौंडण्यापुर -तिवसा जिल्हा अमरावती येथे आयोजित करण्यात आलेला आहे. कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शन लॉग मार्च प्रणेते माजी खासदार प्रा. जोगेंद कवाडे हे असुन कार्यक्रमाचे अध्यक्ष भन्ते प्रियदर्शी पिंपळगांव निपाणी तर प्रमुख पाहुणे म्हणुन भदंत धम्मरत्न टाकरखेडा , आर्या प्रज्ञशिला शिंगोली , पिपल्स रिपब्लिकन पार्टी चे कार्याध्यक्ष भाई जयदिप कवाडे , पिरिपाचे प्रदेश कार्याध्यक्ष चरणदास इंगोले तर प्रा. डि .के वासनिक , विलास पंचभाई , मेघराज डोंगरे , बाळासाहेब इंगोले , लक्ष्मण वाघमारे , वंदनाताई नाईक आदिचा सहभाग लाभणार आहे. तरी सदर कार्यक्रमास बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केलेले आहे.

