भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार,स्वंतत्र भारताचे पहिले कायदा व न्याय मंत्री,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंती निमित्ताने काँग्रेस विधिमंडळ गटनेते,आमदार मा.श्री.विजयभाऊ वडेट्टीवार यांचे जनसंपर्क कार्यालय सावली येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार व फुले अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे उच्च विभूषित तत्वज्ञ, एक दूरदर्शी, एक मुक्तिदाता आणि खरे राष्ट्रवादी होते. समाजातील शोषित आणि वंचित घटकांना मानवी हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी अनेक सामाजिक चळवळींचे नेतृत्व केले. सामाजिक न्यायाच्या संघर्षाचे प्रतीक म्हणून ते उभे आहेत.आधुनिक विकासाचा पाया म्हणून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचाकडे बघितले. शोषित-पीडित, बहुजन समाजाच्या लोकांविरुद्ध होणारा सामाजिक भेदभाव नष्ट करण्यासाठी चळवळ उभारली, तसेच महिलांच्या आणि कामगारांच्या हक्कांचे समर्थन केले.त्यांचे जीवन संघर्षाची कहाणी सांगते,अश्या महामानवास आज काँग्रेसतर्फे अभिवादन करण्यात आले.

अभिवादन करते समयी सावली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नितीन गोहने, शहराध्यक्ष व नगरसेवक विजय मुत्यालवार,उपनगराध्यक्ष संदीप पुण्यपकर,नगरसेवक प्रितम गेडाम,प्रफुल वाळके,सचिन संगीडवार,जेष्ठ पदाधिकारी प्रशांत राईंचवार,युवा पदाधिकारी प्रवीण सुरमवार,जनसंपर्क कार्यालय प्रमुख कमलेश गेडाम,विलास दुधे,प्रमोद डोहने,कुणाल मालवणकर आदी उपस्थित होते.
