संपादक मुनिश्वर बोरकर गडचिरोली


घोट:-महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती घोट च्या वतीने नवोदय हायस्कुल घोट येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीचा कार्यक्रम घेण्यात आला. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष अनिस चे जिल्हा उपाध्यक्ष हेमंत उपाध्य घोट हे लाभले होते तर प्रमुख अतिथी म्हणुन प्रा. मुनिश्वर बोरकर गडचिरोली हे लाभले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पन करण्यात आले. कार्यक्रमास अनिस चे उपाध्यक्ष प्राचार्य कांबळे , कार्याध्यक्ष आशिष शेंन्डे , गोपाल रायपूरे , भोजराज कानेकर , परशराम दुधबावरे , रवि सोमनकर , राकेश भैसारे , पंढरी टाहाके , गौतम काळे आदि प्रामुख्याने उपस्थित होते.
