संपादक मुनिश्वर बोरकर
गडचिरोली:- सावली – सावली तालुक्यातील अंतरगांव येथील सेवा सहकारी सोसायटीची निवडणुक दि १७ मे ला पार पडली व निकाला अंती शेतकरी परिवर्तन पॅनलचे १३ पैकी १२ उमेदवाराचा दणदणीत विजय झाला.

यात शेतकरी परिवर्तन पॅनलचे स्वप्नील पेटकर , यादव ढोलणे सावकार , गिरमाजी कोलते , जितेंद्र श्रीकंडवार , सुरेश जनगनवार , ईश्वर रामटेके , संगिता सहारे , मोहन सुर्यवंशी , प्रभाकर करकाडे , हरिदास भोयर ,सुनंदा संगिडवार आदि सहीत १२ उमेदवारांनी विजय मिळविला.शेतकरी परिवर्तनचे स्वप्नील पेटकर यांच्या नेतृत्वात गावात आनंद उत्सव रॉली काढून आनंद व्यक्त केला. विजयी उमेदवारांचे सर्वांनी अभिनंदन केले.
