✍️दिनेश झाडे
मुख्य संपादक

कोरपना:- चन्द्रपूर जिल्हयातील कोरपना दुर्गम मानीकगड डोंगर पायथ्याशी निसर्गरम्य पकड्डीगडुम प्रकल्प परिसरातील पिपर्डा ग्रामसभेला शासनाने ३६४ हेक्टर वनक्षेत्र बहाल केले या गावात ग्रामसभा व टाटा इन्स्टिट्यूट मार्फत गेल्या ३ वर्षा पासून सर्वेक्षण प्रशिक्षण पर्यावरण व ग्रामसभेला वन उपज अधिकार बहाल झाल्याने गावकरी पुढाकार घेत वनहक्क पट्याचा वापर ग्रामसभेच्या व आदिवासी कुटूंबाच्या कल्याणासाठी करण्याचा संकल्प निर्णय घेऊन सामुहीक वनहक्क समीती च्या माध्यामातून नियोजन विकास आराखडा भौगोलीक परिस्थीचे अवलोकन व वनक्षेत्रातील जल जंगल जमीनी चा उपयोग व्हावा जंगलाचे संरक्षण वण्य प्राणी संरक्षीत रहावे वनातून निर्माण होणाऱ्या औषधी वनस्पती गुणधर्म मोह टोळी बेल कवट डिंक बांबु चारोळी तेंदुपाने या पासून संकलन व रोजगार निर्माण करण्याचे दुष्टीने . वनहक्क ३६४ हेक्टर क्षेत्रात जैविक विविधता व नैसर्गिक वुक्ष जोपासना करूण नव्याने बांबु लागवड भुमीहीन कुटुंबासाठी कमी पावसात निर्माण होणारी फळ जनावराना वैरण व जलसंधारण कामाचे साईट पाहणी करूण पुढील नियोजन व अमल बजावणी व्यवस्थापन करण्यासाठी सर्वघटक शेतकरी शेतमजुर ग्राम पंचायत पदाधिकारी बचत गटाच्या महिला समीती पदाधिकारी यांची शिवार फेरी आयोजित करूण जंगल सवारी करण्यात आली यामुळे गावकऱ्याना जंगलाचे महत्व व भविष्यातील गरजा भागविण्यात वनाची गरज याचा बोध घेता यावा यासाठी समीती अध्यक्ष चन्द्रकला येडमे सामाजिक कार्यकर्ते सय्यद आबिद अली सरपंच इंदिरा कुळमेथे ग्राम पंचायत पदाधिकारी संजय जाधव जगदिश पिंपळकर गोविन्दा कुडमेथे लचु येडमे सुरेखा कुडमेथे वसंता डाखरे पोलीस पाटील महादेव राठोड प्रविण कृचनकर बळीराम कुडमेथे लचु सोयाम प्रविण जगताप नागू पेंदोर यांचे सह मोठया प्रमाणात जंगलाचे रक्षण संरक्षण नियोजन व अभ्यास करुण भविष्यात जंगलाच्या उपलब्ध निसर्गाच्या सान्निध्यात उपलब्ध होणारे गरजा लक्षात घेऊन संवाद व चर्चा करण्यात आली येत्या ५ मार्च ला नागरीकाना प्रशिक्षण व ग्रामसभेत महत्वाचे निर्णय घेण्यात येईल अशी भावना उपस्थितानी व्यक्त केली या शिवार फेरीतून गावात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले हे विषेश
