✍️मुनिश्वर बोरकर
संपादक
गडचिरोली:-गडचिरोली विमानस्थळ विकसित भुसंपादन ठराव पारित करण्यासंबंधाने मुरखळा (नवेगांव) ग्रामपंचायत ची ग्रामसभा सरपंच दशरथ बळीराम चांदेकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. मात्र ग्रामसभेत सदर कामाकरीता शिफारस करणार नाही अशा ठराव मुरखळा ग्रामसभेत सर्वानुमते पारित करण्यात आला. नवेगांव येथील कोटगल उपसा जलसिंचनाचे सुपिक शेतजमिनिवर गावातील शेतकऱ्यांचे उपजिविका अवलंबून आहे. त्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांची शेतजमिन विमानस्थळासाठी गेल्यास शेकडो शेतकरी भुमिहिन होतील. मुडझा पुलखल या गावांना जोडणारे रस्ते कायमचे बंद होतील व गावाचे संबधच तुटतिल सोबत या परिसरात असलेले मोठे तलाव , बोड्या पाण्याचे स्त्रोत बंद पडेल व जनावरांना पिण्याचे पाणी मिळणार नाही उपासमारीची पाळी येइल त्यामुळे सुपिक जमिन विमानस्थळा करीता संपादित करण्यासाठी ग्रामपंचायत शिफारस करणार नाही अशा ठराव मुरखळा ग्रामसभेत पारित करण्यात आला. सदर सभेला तहसिलदार , मंडल अधिकारी , तलाटी , ग्रामसेवक व गावकरी मोठ्या संख्येनी उपस्थित होते.
