प्रशांत कोरटकर यांच्या विरोधात संभाजी ब्रिगेड यांचे मा. पोलीस अधिक्षक चंद्रपुर यांना निवेदन

भद्रावती : तालुका प्रतिनिधी राजेश येसेकर
भद्रावती / चंद्रपुर : कोल्हापूर येथील इतिहास तज्ञ श्री. इंद्रजीत सावंत यांना जीवे मारण्याची धमकी देणारा तसेच छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या बध्दल अपमानजनक आणि एकेरी भाषेचा वापर करणाऱ्या प्रशांत कोरटकर नागपूर यांच्यावर तात्काळ गुन्हा नोंदवुन अटक करण्यात यावी अशी संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकारीनी निवेद्वारे पोलीस अधिक्षक चंद्रपुर मागणी केली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज समस्त भारत देशाचे आराध्य दैवत असून त्यांच्यावर प्रेम करणारे असंख्य शिवप्रेमी आहे. दिनांक 25 फेब्रुवारीला मध्यरात्रीला प्रशांत कोरटकर यांनी इतिहास तज्ञ इंद्रजीत सावंत यांना मोबाईलद्वारे फोन करून जीवे मारण्याची धमकी दिली. सदर संभाषणात छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्य विधाने आणि भाषेचा वापर केला आहे.
त्यात प्रामुख्याने खालील वादग्रस्त मुद्दे संभाषणात नमूद आहे.
१)संभाजी महाराज आय्याश होते हे लोकांना सांगा.
2) बाजीप्रभू देशपांडे नसता तर तुमचा महाराज आज जिवंत नसते.
3) तुमचे महाराज पळून गेले.
4) जेम्स लेन ने जे पुस्तकात म्हटल होत शिवाजीचा बायोलॉजीकल फादर कोण होता हे लोकांना सांगा.
5) जास्त मराठा मराठा करू नका तुम्हाला ब्राह्मणांची औकात काय आहे ते दाखवू
6) शिवाजी महाराजांना देशभर भालजी पेंढारकर ने पोहचविले नाहीतर तुमचा छत्रपती कुठ गेला असता माहीत ही पडल नसतं.
सदर बाबीमुळे देशभरातील असंख्य शिवप्रेमीच्या भावना दुखावल्या गेलेल्या आहे. त्यामुळे आपणास सदर निवेदनातून विनंती करण्यात येते की अशा निच प्रवृत्तीच्या जातीयवादी माणसावर कठोर कार्यवाही करून देशद्रोहाचा गुन्हा नोंदविण्यात यावा व तत्काळ अटक करण्यात यावी. तसेच या प्रशांत कोरटकर यांच्या मागे कोणत्या विकृत समाजविघातक शक्ती आहे त्याचा शोध घ्यावा. नाहीतर असंख्य शिवप्रेमी त्याविरुद्ध तीव्र आवाज उचलणार याची आपण नोंद घ्यावी .
यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक दिलीप चौधरी सार्वजनिक छत्रपती महोत्सव समितीचे निमंत्रक संतोष कुचनकर, शरद पवार विचार मंच जिल्हाध्यक्ष निमेश मानकर सह्याद्री प्रतिष्ठानचे दिलीप रिंगणे, शशिकांत देशमुख
संभाजी ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष चंद्रकांत वैद्य महानगराध्यक्ष विनोद तेरे जिल्हा संघटक अँड. गजू नागपुरे, छत्रपती महोत्सव समितीचे सदस्य बाबा सातपुते, इत्यादी उपस्थित होते
