✍️मुनिश्वर बोरकर
संपादक

गडचिरोली:-पोटेगांव – गडचिरोली तालुक्यातील पोटेगांव ते राजुली व गवळहेटी रोडच्या रुंदिकरण म्हणजे रस्त्याच्या दोन्ही बाजुला मोठ मोठे दगड टाकून त्यावर छोटी गिट्टी न टाकता त्यावर अवैध मुरुमाऐवजी माती पसरविल्या जात असुन रस्त्यावर मोठ मोठे मातीचे ढिगारे पहावयास मिळतात. गेल्या दोन वर्षापूर्वी तयार केलेला रस्ता त्याची पुन्हा दोन वर्ष देखभाल दुरस्तीचे काम त्याच ठेकेदाराकडे असतो. परंतु मोठ मोठे खंडा पडलेल्या रस्त्याची दुरस्ती न करताच रस्त्याच्या दोन्ही बाजुला दगडावर मुरुमाचा थर ऐवजी मातीचा थर वापरल्या जात असुन त्यावर पाण्याचा एकही थेंब टाकल्या गेलेला नाही. सदर काम तिन महिनापासून चालढकल सुरु आहे. रस्त्याच्या दुतर्फा मोठ-मोठे दगड रस्त्यावर आलेले आहेत. दुतर्फा रस्त्यावरील मोठी गिट्टी त्यातही रस्त्यात खड्डे त्यामुळे सदर रस्त्यावरून फोरव्हिलर मुठीत जिवघेऊनच चालवावे लागते. सदर ठेकेदार हा भाजपाचा जिल्हा उपाध्यक्ष असल्याचे कळते. गोड बोलून गावकऱ्यांना ,सरपंच्यांना सहकार्य करीत असतो त्यामुळे सदर रस्त्या रंदिकरणाबाबत गावकरी दबक्या आवाजात आमच्या प्रतिनिधी कडे सांगत होते. संबंधित कामाकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष घ्यावे व होणारा भ्रष्टाचार थांबवावा अशी मागणी सदर परिसरातील गावकऱ्यांनी केली.
