✍️दिनेश झाडे
मुख्य संपादक
राजुरा :-इन्फंट जीजस सोसायटी द्वारा संचालित इन्फंट जिजस इंग्लिश हायस्कूल राजुरा येथे प्रि – प्रायमरी विभागतील नवप्रवेशीत विद्यार्थ्यांसाठी प्रवेश उत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी प्रि – प्रायमरी विभागतील नवप्रवेशीत विद्यार्थ्यांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी विविध भुमिका साकारलेल्या कार्टून कॅरॅक्टर द्वारा सर्व चिमुकल्यांचे स्वागत करून विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. प्रथम अक्षर सेरेमनी उपक्रमांतर्गत उपस्थित मान्यवरांच्या हस्ते चिमुकल्यांना प्रथम हस्ताक्षर गिरविण्यात आले. पालक व विद्यार्थ्यांसाठी विविध खेळ आयोजित करण्यात आले. यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार सुभाष धोटे यांनी चिमुकल्या विद्यार्थ्यांना प्रथम हस्ताक्षर लेखन करण्यास प्रोत्साहन दिले, पालक व शिक्षकांना मार्गदर्शन केले, नवप्रवेशीत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी तसेच उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी संस्थेचे सचिव माजी नगराध्यक्ष अरुण धोटे यांनी देखील नवप्रवेशीत विद्यार्थ्यांचे स्वागत करून त्यांना शुभेच्छा दिल्या व शिक्षक आणि पालकांनी लहानपणापासून विद्यार्थ्यांवर विशेष लक्ष केंद्रित करून सातत्याने प्रोत्साहन दिल्यास यांच्यातून सुजाण व यशस्वी नागरिक घडतील असे सांगितले तर संस्थेचे अध्यक्ष अभिजीत धोटे यांनी सुध्दा चिमुकल्यांचे स्वागत करून शुभेच्छा दिल्या. यावेळी मुख्याध्यापिका मंजुषा अलोने, मुख्याध्यापिका सिमरनकौर भंगू, मुख्याध्यापक रफिक अन्सारी यासह नवप्रवेशीत विद्यार्थ्यांचे पालक, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, शाळेचे विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन माधुरी इर्की यांनी तर आभार प्रदर्शन वरलक्ष्मी इरगुराला यांनी केले.


