✍️ मुनिश्वर बोरकर
संपादक
गडचिरोली:-शासन निर्णय ६ ऑगस्ट 2002 व दिनांक २९ फेब्रुवारी २०२४ च्या स्पष्टीकरणात्मक सुचना नुसार एकस्तर – पदोन्नोतीची वेतननिश्चिती सुधारित करून न दिल्याबाबत वनरक्षक व पदोन्नती वनपाल संघटनेच्या वतीने वनविभाग कार्यालय गडचिरोली समोर बेमुदत कामबंद धरणे आंदोलन पुकारले आहेत. शासकीय माध्यमातून शासकीय योजना जनसामान्य पर्यंत पोहचविण्याचे काम वनपाल – वनरक्षक करीत असतात. वनपाल व वनरक्षकांचे काम पाहुण शासनाने एकस्तर पदोन्नती ची सवलत देऊ केली आहे. परंतु आजतागायत कर्मचाऱ्यांचे एकस्तर वेतनश्रेणी बाबतची मागणी पुर्ण केलेली नाही ‘ म्हणजेच संघटनेच्या मागणीला केराची टोपली दाखविली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यामधे प्रशाननापती असंतोष निर्माण झालेला आहे. सदर मागण्यसाठी वनरक्षक व वनपाल संघटनेने बेमुदत कामबंद आंदोलन पुकारला आहे अशी माहिती चडगुलवार साहेब यांनी पत्रकार परिषदेत पत्रकारांना दिली.सदर बेमुदत कामबंद आंदोलनात संघटनेचे वृत्त अध्यक्ष शिद्धार्थ मेश्राम , सचिव सुनिल पेंदोरकर ‘ विभागीय अध्यक्ष अनंत ठाकरे ‘ विभागीय सचिव गुरुनाथ वाढई राजेंद्र कोडापे , संघटनेचेअध्यक्ष अनंत ठाकरे , सचिव गुरुनाथ वाढई , कार्याध्यक्ष राजेंद कोडापे ,, रुपेश मेश्राम , अतुल धात्रक , सुरेश डंकरवार , अरुण जाबोर , राजु टेंभर्णीकर , विलास कुमोटी , धनश्री दिंकोंडावर , वाय. सी कर्रेवार , लिना गेडाम , रंजना तलांडी सहीत शेकडो वनपाल व वनरक्षक उपोषणाला बसले आहेत.
