राजेश येसेकर : तालुका प्रतिनीधी भद्रावती
भद्रावती : महाराष्ट्र नाभिक महामंडळ शाखा वणी येथे दि.१ मार्च शेतकरी मंदिर येथे नाभिक समाजाचा वधू वर परिचय मेळावा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता. या निमीत्य मा. श्री. निळकंठराव तायडे अमरावती विभागीय संघटक प्रमुख यांच्या जिवनातील पन्नास वर्षच्या समाज कार्यची दखल घेऊन मा. श्री. कल्याणजी दळे साहेब महाराष्ट नाभिक महामंडळ प्रांताध्यक्ष यांच्या हस्ते यांना समाज गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमातचे अध्यक्ष म्हणुन कल्याणजी दळे महाराष्ट्र नाभिक महामंडळ प्रांताध्यक्ष, कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून राजेंद्र भाऊ नागपुरे यांच्या हस्ते झाले .या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी श्री. गजाननराव वाघमारे अमरावती विभागीय अध्यक्ष व निवृत्ती पिस्तूलकर सर व्यासपीठावर सर्व मान्यवर समाज बांधव या कार्यक्रमाचे आयोजन नियोजन श्री. शशिकांत उर्फ गुड्डू नक्षणे महाराष्ट्र नाभिक मंडळाच्या यवतमाळ जिल्हा अध्यक्ष व त्यांची संपूर्ण टीमने केले. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते.
यावेळी सर्वश्री विलासराव माहुरकर तालुका अध्यक्ष अजाबराव चिंचोळकर सामाजिक कार्यकर्ते नरेश कोडे मोहनराव दारवटकर नेर शहर अध्यक्ष नितीन खेडकर रमेश चौधरी प्रज्वल सोनवलकर युवा अध्यक्ष स्वप्निल पाटकर महेश हरसुलकर प्रल्हाद धानोरकर सुरेश घड्डिंगकर तुषार डहाके व सर्व समाज बांधव यांनी अभिनंदन करुन पुढिल कार्ययास शुभेच्छा दिल्या.
