एमआयडीसीत हजारो महिलांचे आंदोलन : युवक काँग्रेसचे समर्थन
दिनेश झाडे
मुख्य संपादक
चंद्रपूर :– एमआयडीसी चंद्रपूर येथे जिल्ह्यातील कामगार व महिलांना सुरक्षा साहित्याची पेटी, भांडे यांचे वितरण करण्यात येत आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या विविध दूरदराज परिसरातील महिला व कामगार या ठिकाणी एकवटले होते. केवळ नाममात्र कामगार, महिलांनाच या साहित्याचे वितरण करून हजारो महिलांना येथे तात्कळत ठेवण्यात आले होते. अनेक दिवसापासून चकरा मारूनही उपाशीपोटी रात्री बेरात्री प्रवास करून या ठिकाणी प्रतीक्षा करून सुद्धा रिकाम्या हाताने परतावे लागत असल्यामुळे कामगार, महिलांमध्ये कमालीचा असंतोष निर्माण झाला त्यामुळे हजारोच्या संख्येने उपस्थित महिलांनी येथे तळ ठोकून आंदोलन सुरू केले. सदर घटनेची माहिती मिळताच चंद्रपूर जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शंतनू धोटे यांनी घटनास्थळाला भेट दिली. सहायक कामगार आयुक्तांची संपर्क करून त्यांना येथील परिस्थितीची जाणीव करून दिली मात्र त्यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला नाही तर याबाबत आपणास अधिक माहिती नसल्याचे सांगून जबाबदारी झटकली. येथे उपस्थित कर्मचाऱ्यांनी प्रशासकीय कारण पुढे करत सर्वर डाऊन असल्यामुळे पेट्या वितरणाला विलंब होत असल्याचे सांगितले त्यानंतर उपस्थित महिला कामगारांशी शंतनु धोटे यांनी संवाद साधला आणि राजकीय इच्छाशक्तीचा अभाव प्रशासकीय दिरंगाई या मुख्य कारणामुळेच सर्वर डाऊन असून गोरगरीब जनतेसाठी सरकारी यंत्रणा आणि हे सर्वर अधिक सक्षम ठेवण्याची जबाबदारी ही शासन प्रशासनाची असून जानिवपुर्वक सर्वर डाऊन असल्याचा आरोप त्यांनी केला. ते पुढे म्हणाले की, अधिवेशनामध्ये मंत्री, आमदार, लोकप्रतिनिधी गुंतले असल्यामुळे सर्वसामान्य महिलांच्या समस्या ऐकायसाठी कुणाकडेही वेळ नाही आणि त्यामुळे महिलांना तात्काळत राहावे लागत आहे. जसे मोठमोठे नेते सहज उपस्थित होतील त्यांचे प्रचार साहित्य बॅनर लागतील तसेच तातडीने सर्वांना हे साहित्य वितरण होईल हे कटू वास्तव सांगितले तर सर्वसामान्यांचा आवाज माध्यमांनी उचलून धरावा आणि गोरगरीब गरजूवंत महिलांना सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी आपण आवाज बुलंद करीत असल्याचे सांगितले. तर आम्हाला पेट्या मिळणार नाहीत तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाहीत अशी कठोर भूमिका उपस्थित महिलांनी घेतली. आता यानंतर प्रशासनाचे हे सर्वर डाऊन कधीपर्यंत होणार व या लाभार्थी महिलांना पेट्यांचे वितरण होऊन त्या सुखरूप पणे घरी पोहोचणार यासाठी राजकीय इच्छाशक्ती प्रशासकीय यंत्रणा कार्यान्वित होईल का आणि सर्वसामान्य महिलांना न्याय मिळेल का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

