✍️मुनिश्वर बोरकर
संपादक
गडचिरोली:-बुद्धगया महाबोधी महाविहार बौद्धाच्या ताब्यात देण्यात यावे या मागणीसाठी राष्ट्रीय शहीद विर बाबुराव शडमाके आदिवासी विकास प्रबोधनी संस्था चे संस्थापक आदिवासी नेते वसंतराव कुलसंगे हे इंदिरा गांधी चौक गडचिरोली येथे लक्षवेधी उपोषणाला बसले आहेत. मंदिर हिन्दूंच्या ताब्यात , मस्जिद मुसलमानाच्या , चर्च ख्रिचनाच्या तर गुरुद्वार शिखाच्या ताब्यात आहेत परंतु बोधगया येथील बौद्धविहार महाबोधी मात्र बौद्धाच्या ताब्यात का नाही ? तेव्हा बौद्धगया महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात घ्यावे. १९४९ चा कायदा केंद्र सरकारने रद्द करावा अश्या मागण्या घेऊन आदिवासी सेवक वंसतराव कुलसंगे उपोषणाला बसले आहेत. उपोषण स्थळाला रिपाई नेते प्रा. मुनिश्वर बोरकर , भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष तुलाराम राऊत , बामसेफ चे जिल्हाध्यक्ष भोजराज कानेकर , सामाजिक कार्यकर्ते शुकदेव वासनिक , माजी बिडिओ बाळकृष्ण बांबोळे , प्रमोद राऊत , ज्ञानेश्वर वाळके , डोमाजी गेडाम ‘ वनकर ,आदिनी उपोषण मंडपाला भेट देऊन सहकार्य करीत आहेत.

