राजेश येसेकर : तालुका प्रतिनिधी भद्रावती प्रतिनिधि भद्रावती
भद्रावती : जामा मसजिद ते नेताजी नगर पर्यंत जाणाऱ्या मार्गावर पार्किंग साठी ठेवलेल्या जागेवर भले मोठे टिनाचे शेड बांधल्यामुळे बाजार वार्डात जामा मस्जिद ते आशिष मोबाइल शापी पर्यंत वाहतुकीला प्रचंड अडथळा होत असल्यामुळे नागरिकांना जिव मुठीत घेवुन या रस्त्यावर रहदारी करावि लागते.जामा मस्जिद ते नेताजी नगर पर्यंत जड वाहनांना रहदारी करण्यास प्रतिबंध असतांनासुद्धा या रस्त्यावर दिवसभर जड वाहनांची वाहतुक सुरु राहत असल्यामुळे नागरिक त्रस्त आहेत.अशातच या रस्त्यावर आशिष मोबाइल शॉपीचे भव्य शो रूम आहे.शो रुममधे येनारे जानारे ग्राहकांच्या वाहनांसाठी मोबाइल शापीच्या मालकाने समोर पार्किंग करीता खुली जागा ठेवली होती.रहदारी सुरळीत सुरु होती.परंतु गेल्या तीन महीन्यात राज्यात नविन सरकार आल्यापासुन शापी मालकाने पार्किंग साठी ठेवलेल्या जागेवर भले मोठे टिनाचे शेड ऊभारुन त्या जागेवर दुसरा व्यवसाय सुरु केला.परिणामत: शापीमधे येणारे ग्राहक रस्त्यावरच आपली वाहने ऊभी करतात.यामुळे या परिसरात रहदारीला प्रचंड अडथळा निर्माण होत असतो. रस्त्यावर अनेक किरकोळ अपघात झाले आहे. आहेत, सुदैवाने जिवहानी झाली नाही.विशेष म्हणजे याच रस्त्यावर दर बुधवार ला आठवडी बाजार भरत असतो.तेंव्हा तर तारेवरची कसरत करुनच नागरिकांना आपले व्यवहार करावे लागते.याच शेडचे पाणी पावसाळ्याचे दिवसात बाजुला कच्चे घराच्या भिंतीच्या पायथ्याशी मुरुन लहान लहान विद्यार्थ्यांचे जिवाला धोका निर्माण होणार आहे.तेव्हा अवैद्य टिनाचे शेड हटविन्यात यावे, अशी तक्रार बाजार वार्डचे नागरिक शेजारील घर मालकांनी न.प.प्रशासनाला तक्रार दिली आहे.
