🛑मृतक व त्यांच्या कुटुंबीयांबद्दल व्यक्त केली सहानुभूती
✍️दिनेश झाडे
मुख्य संपादक
राजुरा:-जम्मू काश्मीर येथील पहलगाम या ठिकाणी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात देशाच्या विविध भागातील जवळपास २८ पर्यटक यांचे नाहक बळी गेले आहेत. मृतांमध्ये ६ महाराष्ट्रीयन नागरिकांचा समावेश असल्याचे वृत्त आहे. हे वृत्त समजताच संपूर्ण महाराष्ट्रात, देशात शोककळा पसरली आहे. अत्यंत निंदनीय आणि संतापजनक अशा या दहशतवादी हल्ल्यानंतर जनमानसात कमालीचा असंतोष निर्माण झाला आहे.जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे फिरायला गेलेल्या पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात आपले जीव गमावलेल्या सर्व मृतात्म्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांप्रती चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाष धोटे यांनी दुःख व्यक्त केले आहे. या घटनेने फक्त मीच नाही तर संपूर्ण देशातील जनता व्यथित झाली आहे. मृतकांच्या परिवाराच्या दु:खात मी सहभागी आहे असे म्हणत त्यांनी दहशतवाद्यांच्या या भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध केला आहे. यासाठी जबाबदार असणाऱ्या दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे निष्पाप लोकांचे जीव घेणाऱ्या या सर्व दहशतवाद्यांना आणि यांच्या मास्टरमाइंडला शोधून त्यांना कडक शिक्षा दिली जावी अशी मागणी त्यांनी शासनाकडे केली आहे. अशा प्रकारच्या भ्याड हल्लाला भारत देश कधी घाबरत नाही मात्र कडेकोट बंदोबस्त असतांनाही सुरक्षा व्यवस्था भेदून निष्पाप पर्यटकांवर बेछूट गोळीबार करून दहशतवाद्यांनी अमानविय कृत्य केले आहे याचा संपूर्ण बिमोड करण्याची गरज आता निर्माण झाली असून शासनाने अतिशय गांभीर्याने दखल घेऊन देशातील दहशतवादाचा आत्मा करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

