✍️ मुनिश्वर बोरकर
संपादक

गडचिरोली:-भारत सरकारच्या उपक्रमाद्वारे विविध प्रांतातुन येणारे कलाकार आपल्या लोकनृत्यातूनआपली कला कौश्यल दाखवतातच सोबत आपली संस्कृती सुद्धा जोपासतात आज दंडकारण्य संस्थेच्या प्राचार्य मुनघाटे साहेबांच्या सहकार्याने गडचिरोली येथे होत असलेल्या लोकनृत्य गडचिरोली करासाठी एक पर्वणी ठरणार आहे. असे विचार माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी यांनी उदघाटन प्रसंगी मांडले. सांस्कृतिक मंत्रालय भारत सरकार व दंडकारण्य शिक्षण संस्था गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने लोकनृत्य भारत – भारती कार्यक्रम विद्याभारती कन्या हायस्कुल तथा कनिष्ठ महाविद्यालय गडचिरोली येथे तिन दिवसीय कार्यक्रमाचे उदघाटन पार पडले. कार्यक्रमाचे उदघाटक माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी तर प्रमुख पाहुणे म्हणुन प्राचार्य डॉ. राजाभाऊ मुनघाटे , समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त सचिन मडावी , सांस्कृतिक कार्यक्रमाचे उपसंचालक संदिप शेंन्डे मुंबई , भुर्गभ शास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. गुणवंत वडपल्लीवार कुरखेडा , सांस्कृतिक कार्यक्रम विभाग प्रमुख भारत सरकार दिपक कुळकर्णी आदि लाभले होते. कार्यक्रमाचे संचलन प्रा. नरेंद्र आरेकर कुरखेडा प्रास्ताविक दिपक कुळकर्णी तर आभार प्रा. डॉ. गुणवंत वडपल्लीवार यांनी मानले. कार्यक्रमास बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.
