✍️मुनिश्वर बोरकर
संपादक
गडचिरोली:- गडचिरोली तालुक्यातील आंबेशिवणी कठाणी नदिघाटावरून अवैध रेती वाहतुक करणारा टिप्पर गडचिरोली चे तहसिलदार गव्हारे यांनी रंगेहाथ पकडला. आंबेशिवणी नदिघाट शासनाने घरकुल योजनेतील घरकुल मालकांना पाच ब्रास रेती पुरविण्यासाठी मंजुरी दिली. परंतु संबंधित ठेकेदार उलट सुलट धंदा करून रेतीची विक्री करतात. या भागातून रात्रौ अवैध रेतीने भरलेले टॉक्टर , टिप्पर जातांना दिसतात. अवैध रेती वाहतुक होत असल्याचा सुगावा तहसिलदार गडचिरोली यांना लागताच त्यांनी दि. २४ ला दुपारी २च्या सुमारास आंबेशिवणी नदिघाटावरून वाहन कमांक 33 टि ५६८४ या वाहनाने रेती नेत असतांना टिप्परची चौकशी केली असता अवैध रेती चोरी करीत असल्याचे निर्दशनास आले त्यामुळे तहसिलदारांनी सदर टिप्पर रंगेहाथ पकडून तहसिल कार्यालयात आणले. सदर टिप्परने दिवसा ढवळ्या रेतीची चोरी ठेकेदारांच्या आर्शिवादाने होत असल्याचा दाट शंसय व्यक्त केल्या जात असुन संबधित ठेकेदार मांतब्बर व राजकीय पक्षाचे आहेत त्यामुळे हे सर्व ठेकेदार सदर प्रकराणातून मार्ग काढण्याच्या उद्देशाने तहसिल कार्यालयात जमले होते. तहसिलदारांना फोन लावला असता उचलला नाही. परंतु रेती जप्त केल्याचे कळते. राखी – गुरवळा नदिघाटावरून रात्रौ – पहाटेला ट्राक्टरने दररोज अवैध रेती वाहतुक होतांना दिसतो व कठाणी नदिघाटावर असाच प्रकार सुरु आहे. तो तहसिलदारांच्या आर्शिवादाने होत असल्याचे कळते.
