व्येकटेश चालुरकर
तालुका प्रतिनिधी अहेरी
गडचिरोली –
अहेरीत विविध ज्वलंत समस्या तत्काळ सोडविण्यात याव्या यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या नेत्या भाग्यश्रीताई आत्राम शाहीन हकीम. जहीर हकीम. ऋषीं पोरतेट.कारू सेट ,दशरत सूनतकर यांच्या मार्गदर्शनात नगरसेवक अमोल मुक्कावार,अमोल रामटेके,राहुल दुर्गे हे अहेरी येथील मुख्य चौकात उपोषणाचा आज दुसरा दिवस. अहेरी येथील प्रतिष्ठान बंद पाडून मागणी केलेली आहे.
अहेरी ते प्राणहिता पोलिस उपमुख्यालय या रस्त्याचे डांबरीकरण मागील एका वर्षापासून रखडले आहे सर्वत्र धुळीचे वातावरण आहे त्यामुळे तत्काळ या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात यावे,अहेरी परिसरातीलगडअहेरी,चेरपल्ली,इंदिरानगर,गडबामणी येथे पाणी टाकी बांधण्यात यावी,नगर पंचायत क्षेत्रातील वन हक्क पट्टे प्रकरण तत्काळ वरच्या स्तराला पाठविण्यात यावे,अपंग बांधवांना अहेरी येथेच प्रमाणपत्र मिळावे,निराधार व श्रावण बाळ योजनेतील अनुदान महिन्याच्या एक तारखेला खात्यात जमा करावे अशा प्रमुख मागण्या घेऊन आज दिनांक 25/02/2025 रोज अहेरी येथील बाजारपेठ बंद करून आंदोलन तीव्र करण्यात आले. माजी जी. प. अध्यक्ष भाग्यश्री ताई आत्राम यांच्या मार्गदर्शनात केले आहे. यात अहेरी येथील सर्व प्रतिष्टीत मान्यवर. विविध संगठना उपस्थित राहुन
समर्थ देणार आहे.
आज दुसऱ्या दिवशी सुद्धा आमरण उपोषण सुरूच आहे. तर बलवन्त रामटेके कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग आलापल्ली. ठाणेदार स्वप्नील इजपवार. तहसीलदार बालाजी सोमवंशी यांनी चर्चा केली करतांना म्हणाले कंत्राटदाराला नोटीस दिली व ठेकेदाराणी काम सुरु करण्याची हमी दिली असे 28 /22025 ला काम सुरु करू असे नोटीस मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागात दिला. ठेकेदाराला रोज 1000 रू प्रमाणे फाईन सुरु आहे. प्रोग्रेस नसल्याने त्यावर फाईन लावणे सुरु आहे.28 तारखेला काम सुरु करू असे आस्वासन बांधकाम विभागाचे अधिकारी कार्यकारी अभियंता रामटेके यांनी दिली.
