संपादक प्रा. मुनिश्वर बोरकर गडचिरोली.
गडचिरोली:-राजश्री छत्रपती शाहु महाराज यांची जयंती निमित्य सामाजिक न्याय दिवश म्हणुन साजरा करण्यात आला. याप्रसंगी जिल्हाधिकारी अविशांत पंडा यांनी आपल्या मार्गदर्शनात म्हणाले की विद्यार्थी हा केंद्रबिंदु मानुन विकासाचे नियोजन करण्यात येइल याचाच एक भाग म्हणुन घर घर संविधान राबविल्या जाईल , स्पर्धा परीक्षा ,परदेशी शिक्षण या उपक्रमांना सुद्धा प्राध्यान्य देण्यात येईल.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे , सामाजिक न्याय विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ. सचिन मडावी , डॉ. आशिष खोब्रागडे , दिलीप बारसागडे , समाजकल्याण अधिकारी चेतन हिवंज लेखाधिकारी कुलदिप मेश्राम आदिची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी विद्यार्थ्यांचा सत्कारही करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक आयुक्त डॉ. सचिन मडावी यांनी केले. कार्यक्रमास सामाजिक न्याय विभागाचे कर्मचारी व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.


