राजेश येसेकर : तालुका प्रतिनिधी भद्रावती
भद्रावती : पोलीस स्टेशनचे नवनियुक्त ठाणेदार लता वाढिवे यांनी पदभार स्विकारल्या नंतर भद्रावती परीसरातील अवैधधंदे घरफोडि चोऱ्या, अवैध दारु, गांजा, ड्रग्स विक्री करणाऱ्या अशा अवैधदे व गुन्हेगारीला आळा घालण्याचे आव्हान स्विकारताच आमली पदार्थाचे सेवन करणाऱ्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले दि. २६ फेब्रुवारीला भद्रावती पोलीस स्टेशनचे पथक पेट्रोलिंग करीत असताना भद्रावती येथील निते हॉस्पिटल जवळिल भंगार दुकानाच्या समोरील झाडाखाली दोन आरोपी प्रथम विनोद सांडे (१९ ) चंडीका वार्ड व नागसेन उर्फ लक्की गोपाल साव (२४) रा. चोरा ता. भद्रावती हे गांजासारखा आमली पदार्थ जाळून ओढत असतांना पकडले
तसेच पंचायत समिती समोरील जुने बंद असलेले पशु वैध्यकिय दवाखान्याचे खुल्या जागेत आरोपी आयुष देवानंद नरवडे (२०) शिविजी नगर भद्रावती हा सुद्धा चिलमीद्वारे गांजा ओडत असताना त्याला अटक केले. भद्रावती पोलिसांनी तिन्ही आरोपी विरुध्द एनडपीएस ॲक्ट कलम २७ नुसार गुन्हा नोंदविला आहे.
सदर कारवाई भद्रावती पोलीस स्टेशनचे नवनियुक्त ठाणेदार लता वाढिवे यांच्या नेतृत्वात उपनिरीक्षक गजानन तुपकर हवालदार जगदिश झाडें व पोलिसांनी केले.
