✍️मुनिश्वर बोरकर
संपादक

गडचिरोली:-धानोरा पंचायत समिती . अंतर्गत येत असलेली आदिवासी भागातील पुस्टोला – पेंढरी मुख्य मार्गवरील चिचोडा ग्रामपंचायत नेहमीच कुलुपबंद , रामभरोसे असतो. अशी तक्रार चिचोडा ग्रामस्थाची आहे. चिचोडा ग्रामस्थाचे म्हणणे असे की सदर ग्रामसेवक मुख्यालयी न राहता गडचिरोली येथे राहतो व महिन्यातून एकदाच येतात. धानोरा पंचायत समिती मधील अतिदुर्गम भागातील चिचोडा , सावरगांव , कुलभट्टी व इतर ग्रामपंचायती मधील ग्रामसेवक व संवर्ग विकास अधिकारी धानोरा यांचे संगनमत असुन अनेक ग्रामसेवकाकडू पैसे घेऊन गैरहजर राहु देण्याचा प्रकार बिडिओ मार्फतीने केल्या जात असल्याची ग्रामसेवकात चर्चा असुन बिडिओच्या आर्शिवादाने हा सगळा प्रकार सुरु असल्याचे कळते.
