✍️मुनिश्वर बोरकर
संपादक
गडचिरोली:-गडचिरोली आगारातील भंगार बसेस कधि कुठेही जंगलात बंद पळत होत्या त्यामुळे प्रवासांना फार त्रास सहन करावा लागत होता. दुसऱ्या बसची वाट ताटकळत पाहावी लागत होती.शाळेकरी मुलींना सुद्धा जिव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागत होता. पावसाळ्यात भंगार बसेस च्या टपातुन पाणी गळती व्हायची असे प्रकार अनेकदा घडले ग्राहकांच्या अनेक तक्रारी लक्षात घेऊन अखिल भारतीय ग्राहक पंचायत गडचिरोलीने यांची दखल घेऊन गडचिरोली आगाराला नविन बसेसचा पुरवठा करावा व प्रवासांना दिलासा घ्यावा अशी मागणी एस टी . महामंडळ यांचेकडे मागील वर्षी केली होती. याची दखल घेऊन एस .टी महामंडळाने नव्या कोऱ्या ४० बसेस गडचिरोली आगारात दाखल झाल्यात व त्या रस्त्यावरही धावू लागल्या आहेत. आता नव्या कोऱ्या बसेसमुळे प्रवासांना प्रवास करणे सुखकर व सोयीचे होणार आहे.
