✍️राजेश येसेकर
भद्रावती प्रतिनिधी
भद्रावती:-भद्रावती तहसील कार्यालयासमोर सुरू असलेल्या निप्पान प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनाला माजी मंत्री तथा बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी दिनांक 15 रोज मंगळवारला सकाळी 11 वाजता भेट दिली यावेळी आमदार मुनगंटीवार यांनी प्रकल्पग्रस्तांच्या समस्या व मागण्या जाणून घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. सदर बाब ही वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्राच्या आमदारांच्या अखत्यारित येत असल्यामुळे याबाबत आपण येथील आमदारांची भेट घेऊन यावर काय तोडगा काढता येईल यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन आमदार मुनगंटीवार यांनी यावेळी प्रकल्पग्रस्तांना दिले. मी मंत्रिमंडळात नसल्यामुळे काही मर्यादा आलेल्या आहेत अशी खंत व्यक्त करून या प्रकरणात माझ्याकडून काय मदत करता येईल ती मी अवश्य करेल असे त्यांनी यावेळी प्रकल्पग्रस्तांना सांगितले. प्रती एकर दहा लाख रुपये अनुदान, नोकरीची हमी व त्रिपक्षीय करार करणे या मागण्यांसह अन्य मागण्यांना घेऊन निपाण प्रकल्पग्रस्तांतर्फे सदर आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. आज आंदोलनाचा 21वा दिवस आहे. निप्पानसाठी अधिग्रहित केलेल्या जागेवर तब्बल 25 वर्षानंतर दोन कंपन्यांच्या उभारणीला सुरुवात करण्यात आली आहे. मात्र असे करताना शासनाने प्रकल्पग्रस्तांच्या समस्या व मागण्यांकडे दुर्लक्ष केले असल्याचा आरोप आंदोलनकर्त्या प्रकल्पग्रस्तांनी केला तसेच आंदोलनात सत्तारुढ सरकार चे समर्थक असूनही आम्हावर उपोषण करण्याची वेळ आलीहे दुर्दैवी आहे अशी खंत मधुकर सावनकर, अध्यक्ष प्रविण सातपुते, बापुराव सोयाम, चेतन गुंडावार यांनी तसेच इतर प्रकल्पग्रस्तांनी व्यक्त केली. यावेळी अमित गुंडावर, चंद्रकांत गुंडावार, किशोर आसुटकर आदी भाजपाचे पदाधिकारी व निपॉन प्रकल्पग्रस्त संघर्ष समिती चे बंडू भादेकर, बाबा तराळे देवराव खापणे, सुधीर सातपुते, तेजकरण बदखल, रवी बोडेकर, जगन दानव, बंडू डोये, नानेबाई माथनकर, व इतर प्रकल्पग्रस्त उपस्थित होते.असे संघर्ष समितीच्या वतीने प्रसिद्धी प्रमूख लिमेश माणूसमारे कळवितात.

