✍️दिनेश झाडे
मुख्य संपादक
गडचांदुर:-महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीचे औचित्य साधून दिनांक १४ एप्रिल २०२५ रोज सोमवारला वेळ सायंकाळी ०५ : ०० वाजता स्थळ- धम्मध्वज चबुतऱ्याजवळ मौजा उपरवाही ता कोरपना जि चंद्रपूर येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया संस्थापक डॉ बाबासाहेब आंबेडकर विद्यमान राष्ट्रीय अध्यक्ष एस. राजिंद्रन कर्नाटक, राष्ट्रीय सरचिटणीस डॉ राजेंद्र गवई जिल्हाध्यक्ष गोपालजी रायपूरे या पक्षाच्या शाखा उपरवाही ता. कोरपना जि. चंद्रपूर या शाखा फलकाचे अनावरण करण्यात आले.👇👇

सदर शाखा फलकाचा अनावरण कार्यक्रम रिपब्लिकन कार्यकर्ते कवडूजी मोहुर्ले यांच्या अध्यक्षतेखाली रिपब्लिकन कार्यकर्ते तथा अनैशा वाहन चालक कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुरजभाऊ उपरे, प्रविण गेडाम यांच्या उपस्थितीत रिपब्लिकन चळवळीचे प्रचारक आणि रिपब्लिकन कार्यकर्ते अशोककुमार उमरे यांच्या हस्ते आणि उपरवाही येथील रिपब्लिकन महिला पुरुष कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत अनावरण कार्यक्रम संपन्न झाला.अनावरण कार्यक्रमानंतर गावातील मुख्य मार्गानी भीम जयंती मिरवणूक काढण्यात आली.
