गडचिरोली मुनिश्वर बोरकर संपादक
सावली:- सावली तालुक्यातील केरोडा (जॉम्ब ) मॅर्डर प्रकरणातील सावली पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे ४ आरोपींना पकडून त्यांचे वर गुन्हे दाखल करून तिन दिवसाच्या PCR नंतर आज दि. १६ मे ला न्यायालयाच्या आदेशानुसार त्या आरोपींना MCR कारागृह चंद्रपूर मधे पाठवले. मृतक शमिर खंडारे व अभय वालदे या दोघामधे रस्त्यावर गाडी ठेवू नकोस या वादातून आरोपी अभय वालदे यांनी व्याहाड (बाजार) वरून आपल्या मित्र पियुष लाटलीवार व शाहील मुकेश शडमाके यांना बोलवून मृत्यूक शमीर खंडारे यांना आरोपी १ ,२ ,3 हे शमीरला शिविगाळ करून मारहान करीत असतांना आरोपी शाहिल मुकेश शडमाके मागावून आला व त्याने चाकुने मृत्युकांच्या पोटावर व छातीवर सपासप ६ वेळा वार केला व यातच शमीरचा घात झाला व तो जागीच ठार झाल्यावर मुख्य आरोपीने मॅर्डर मधे वापरलेला चाकु नालीत फेकुन दिला.तिन आरोपी बाहेरगावी पळ काढला तर एक आरोपीला केरोडा गावातच पकडले.
आरोपी १ ते 3 वर भारतिय न्याय सहिता नुसार अपराध क्रंमाक 86 / 15 कलम १०३ ( । ) (3) ५ नुसार गुन्हे दाखल करण्यात आले असुन आरोपी १ ते 3 यांना चंदपूर कारागृहात रवानगी करण्यात आली.
आरोपी नंबर ४ शाहिल मुकेश शडमाके वय १६ वर्ष 3 महिने रा. व्याहाड हा अल्पवयीन म्हणुन त्याला बाल सुधारगृह चंद्रपूर येथे पाठविण्यात आले. सदर संपूर्ण तपास ठाणेदार पुलुरवार सावली यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.
महत्वाची बाब अशी की , मुख्य आरोपी शाहील मुकेश शडमाके वय १६ वर्ष 3 महिने व्याहाड हा अल्पवयीन जरी असला तरी तो प्रौढा सारखा वागला त्याला मॅर्डर कसा करावा का करावा एवढी प्रौढा सारखी अक्कल त्याला आलेली आहे. त्यामुळे त्यांचेवरही खुनाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी न्यायालयाकडे सावली ठाणेदारांनी केलेली आहे हे विशेष.









