शेतक-यांच्या प्रश्नांवर काॅग्रेस आक्रमक : चंद्रपूरात शेतकरी सन्मान धरणे आंदोलनात हजारोंची उपस्थिती
दिनेश झाडे
मुख्य संपादक

चंद्रपूर:–स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना कृषी प्रधान भारतात शासनाच्या चुकीच्या धोरणांमुळे लाखो शेतकरी आत्महत्या करीत आहेत. शेतमालाला भाव नाही, शेती साहित्य, खते, कीटकनाशके यावर वारेमाप जिएसटी, कर्जाचे थकलेले हप्ते, दुष्काळग्रस्तांना तुटपुंजी मदत, शेतकरी आंदोलनाची दखल न घेणे, लाडकी बहिण, संजय गांधी निराधार योजनेतून निकष लावून अनुदान बंद करणे, देशात – राज्यात वाढता गुंडाराज, अराजकता, महापुरुषांचा अपमान, महिला सुरक्षा धोक्यात, वाढती महागाई, बेरोजगारी, भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे भारतीय अर्थव्यवस्था संकटात अशा अनेक समस्या आवासून उभ्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी काँग्रेस सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहून केंद्र व राज्य सरकारने आश्वासनपुर्ती न केल्यास तीव्र आंदोलन उभारून न्याय मिळवून देण्यासाठी संघर्ष करेल असे मत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाष धोटे यांनी व्यक्त केले.
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी सोमवार दि. ३ मार्च २०२५ ला सकाळी ठिक ११ : ३० वाजता चंद्रपूर येथील प्रियदर्शनी इंदिरा गांधी चौक येथे हजारोंच्या उपस्थित धरणे आंदोलन करण्यात आले. केंद्र व राज्य सरकार च्या चुकीच्या धोरणामुळे जगाचा पोशिंदा, अन्नदाता शेतकरी बांधव हा अकारण भरडला जात आहे. त्यामुळे कृषिप्रधान भारताचा कणा असलेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी, शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने शासनाने तातडीने पुर्ण करावीत यासाठी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस च्या निर्देशानुसार शेतकरी सन्मान धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हातील सहाही विधानसभा काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या मनोगतातून भाजप सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांवर प्रहार केला. सरकार विरोधात आणि शेतकरी, गोरगरीब जनतेच्या न्यायासाठी घोषणा करण्यात आल्या.
या प्रसंगी चंद्रपूर जिल्हाचे काँग्रेसचे निरीक्षक मुजीब पठाण, जिल्हा काँग्रेसचे शहराध्यक्ष रीतेश तिवारी, महिला काँग्रेस जिल्हाध्यक्षा सुनंदा धोबे, माजी जिल्हाध्यक्ष सुभाषसिह गौर, विनोद दत्तात्रय, चंदाताई वैरागडे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष संतोषसिंग रावत, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शंतनू धोटे, शरह जिल्हाध्यक्ष राजेश अडुर, दिनेश चोखारे, संतोष लहामगे, सुनीता लोढीया, अश्विनी खोब्रागडे, घनश्याम मुलचंदाणी, अरुण धोटे, विजयराव बावणे, किसान काँग्रेसचे भालचंद्र दानव, तालुकाध्यक्ष अनिल नरुले, नितीन गोहणे, उत्तमराव पेचे, रंजन लांडे, मिलिंद भोयर, रमाकांत लोधे, विजय गावंडे, गुरू गुरूनुले, देविदास सातपुते, खेमराज तिडके, प्रमोद चौधरी, वासुदेव पाल, गोविंदा उपरे, अब्दुल करीम, विलास टिपले, अवधूत कोट्टेवार, भिमराव मडावी, श्यामराव कोटणाके, प्रा. अनिल शिंदे, राजु रेड्डी, एजाज अहमद, घनश्याम येनुरकर, राकेश रत्नावार, नंदकिशोर वाढई, प्रमोद बोरीकर, विमाशी जिल्हा कार्यवाहक सुनील शेरकी, कुणाल चहारे, सुलतान अशरफ अली, प्रशांत दानव, अनुताई देहेगावकर, यासह महिला तालुकाध्यक्ष, चंद्रपूर जिल्हा काँग्रेस, जिल्हा शहर काँग्रेस तथा काँग्रेसच्या सर्व फ्रंटल आर्गनायझेशनचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेतकरी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
